युक्रेनमधील भारतीयांना कोरोना सर्टिफिकेटशिवाय करता येणार प्रवास

युक्रेन
युक्रेनसकाळ

युक्रेनमधून भारतात परतणाऱ्या नागरिकांसाठी भारतीय दुतावासाकडून मार्गदर्शक सुचना जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यानुसार याआधी भारतात येताना कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे प्रमाणपत्र बाळगणे अनिवार्य होते, दरम्यान या मार्गदर्शक सुचनांमध्ये आता बदल करण्यात आला आहे.

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर तेथील विमान सेवा रद्द करण्यात आल्याने याचा सर्वाधिक फटका युक्रेनमध्ये अडकलेल्या वैद्याकिय शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थांना बसला आहे. विमान सेवा बंद असल्यामुळे जवळपास 18 हजारहून अधिक भारतीय नागरिक युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. या नागरिकांना सुखरुप मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारकडून (Indian Government) प्रयत्न सूरू आहेत. दरम्यान, युक्रेनमधील भारतीय दुतावासाकडून युक्रेनमधील नागरिकांसाठी महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात काल आल्या होत्या. दरम्यान यामध्ये आज बदल करण्यात आला आहे.

युक्रेन
युक्रेनमध्ये प्रवासादरम्यान भारताचा झेंडा लावा; दुतावासाच्या सूचना

यापूर्वी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार, युक्रेनमधील भारतीय नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे प्रमाणपत्रदेखील बाळगण्याच्या सूचना केल्या होत्या. दरम्यान, युक्रेन मधील नागरिकांना मायदेशी सुखरूप परत आणण्यासाठी आणि मानवतेच्या दृष्टीने भारतीय हवाई उड्डाण मंत्रालयाने कोरोना संबधीत मार्गदर्शक सुचनांमध्ये बदल केला आहे.त्यानुसार, युक्रेनमधून भारतात येणाऱ्या नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे प्रमाणपत्र बाळगणे आवश्यकता नाही.

दिल्ली एअरपोर्टने प्रवाशासाठीच्या मार्गदर्शक सूचनामध्ये बदल केले आहे. ''लसीकरण न केलेले आणि कोविड-19 संक्रमणाचा निगेटिव्ह रिपोर्ट सोबत नसेल तरी भारतीय नागरिकांना उड्डाण करण्यापूर्वी Air Suvidha कागदपत्रे अपलोड करण्यासाठी सूट दिली जाईल आणि विमानतळावर प्रवेश करता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com