
पश्चिम अफ्रिकेतील मालीमध्ये एका सिमेंट कारखान्यात काम करणाऱ्या तीन भारतीय नागरिकांचे अल-कायदाच्या या संघटनेशी संबंधित असलेल्या दहशतवाद्यांनी अपहरण केले आहे. एका वृत्तानुसार, गुरुवारी अधिकाऱ्यांनी याची पुष्टी केली आहे. पश्चिम आफ्रिकी देश मालीच्या अनेक भागात दहशतवादी हल्ले झाले आहेत. दरम्यान, भारतीय नागरिकांचे अपहरण करण्यात आले. याबद्दल चिंता व्यक्त करत भारताने माली सरकारला त्यांची सुटका सुनिश्चित करण्यास सांगितले आहे.