भारताचे वागणे बिघडलेल्या मुलासारखे : चीन

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

बीजिंग  : भारताचे वागणे हे बिघडलेल्या मुलासारखे असून, तिबेटचे आध्यात्मिक गुरू दलाई लामा यांच्यामार्फत चीनला शह देण्याचे प्रकार थांबवावेत, असे चीनच्या सरकारी वृत्तपत्राने म्हटले आहे.

ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे, की ""अमेरिका ही आमच्या नादाला लागताना दोनदा विचार करते. तिथे भारताने असले प्रकार टाळावेत. चीनने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना तैवान प्रकरणी कसे हाताळले यातून भारताने धडे घ्यावेत. सर्वांत मोठी लोकशाही म्हणून टेंभा मिरवणाऱ्या भारतात एक विकसित व महान देश म्हणून पुढे येण्याची क्षमता आहे. मात्र, त्यांची धोरणे तितकी दूरदर्शी नाहीत.''

भारताने मंगोलियाला 1 अब्ज डॉलरची मदत जाहीर केली आहे. हा निर्णय चीनला खटकला असून, मागे चीनने दलाई लामा यांचा मंगोलिया दौरा दबाब आणून रोखला होता. चीनच्या आक्रमकतेविरोधात भारताने हस्तक्षेप करावा, अशी मागणीही मंगोलियाच्या दूताने भारताकडे केली होती.

Web Title: india's behaiour like naughty boy