
नवी दिल्ली : युक्रेन आणि रशियाच्या (Ukraine Russia War) युद्धादरम्यान भारतीय विद्यार्थांच्या सुटकेसाठी सुरू करण्यात आलेले ऑपरेशन गंगा उद्यापासून संपणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच या मोहिमेसाठी चार देशांमध्ये पाठविलेल्या नेत्यांना देखील भारतात परत बोलावले जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. रशियाने 24 फेब्रुवारी रोजी युक्रेनवर आक्रमण केल्यापासून, सरकारने सुमारे 18,000 भारतीय नागरिकांना युक्रेनमधून सुखरुप बाहेर काढले आहे, त्यापैकी बहुतेक विद्यार्थी आहेत. केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांनी आज ट्वीट केले असून, रोमानियाहून शेवटचे विशेष विमान उड्डाण करत असल्याचे ट्वीटमध्ये म्हटले आहे. याबाबत एनडीटीव्हीने वृत्त प्राकशित केले आहे. (India Operation Ganga In Ukraine )
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, युक्रेनमधून सरकारी पथकांच्या परतीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, ऑपरेशन गंगा अंतर्गत शेवटची उड्डाणे उद्या संध्याकाळपर्यंत चालवली जाणार आहेत. फेब्रुवारीमध्ये रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून, सरकारने सुमारे 18,000 भारतीय विद्यार्थांना सुखरूप बाहेर काढले असून, सुमीमध्ये अडकलेल्या सुमारे 700 विद्यार्थ्यांची शेवटची तुकडी पश्चिम युक्रेनकडे रवाना झाली आहे.
भारताने शेजार धर्म पाळला; शेख हसीना यांनी मानले PM मोदींचे आभार
युद्धग्रस्त युक्रेनमध्ये (Russia Ukraine War) अडकलेल्या भारतीयांची सुखरूप सुटका करण्यासाठी भारत सरकारकडून ऑपरेशन गंगा (Operation Ganga) राबवले जात आहे. या मोहिमेअंतर्गत भारत सरकारकडून भारताव्यतिरिक्त इतर देशांतील नागरिकांनाही बाहेर काढण्यात आले असून, बांगलादेशातील नऊ नागरिकांना अशाच प्रकारे सुखरूप बाहेर काढल्याबद्दल बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. (Bangladesh PM Sheikh Hasina Thanks To Modi For Help )
'ऑपरेशन गंगा' अंतर्गत भारताने पाकिस्तान, नेपाळ आणि ट्युनिशियासह इतर अनेक देशांतील अडकलेल्या नागरिकांचीदेखील सुखरूप सुटका केली आहे. या मदतीसाठी पाकिस्तानमधील (Pakistan) एका विद्यार्थ्याने युक्रेनमधून सुखरूप सुटका केल्याबद्दल कीवमधील (Kyiv) भारतीय दूतावास आणि पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले होते. याबाबतच एक व्हिडिओ एएनआय वृत्तसंस्थेने शेअर केला आहे. (Indians In Ukraine)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.