चिनी माध्यमांनी घेतली भारताची बाजू; G7 देशांना सुनावलं | Wheat Export Ban | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

China and India

चिनी माध्यमांनी घेतली भारताची बाजू; G7 देशांना सुनावलं

बीजिंग : भारताच्या गहू निर्यात (Wheat Export Ban) बंदीच्या निर्णयानंतर G7 देशांकडून भारतावर जोरदार टीका केली जात आहे. परंतु, नेहमी भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या चीनी माध्यामांनी मात्र भारताची बाजू घेतली आहे. दरम्यान, जगातील सर्वात शक्तिशाली देशांच्या (G7) गटाविरोधात चिनी माध्यमे उभी राहिल्याने आश्चर्य व्यक्त होत असून, चीन सरकारचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सने "भारताला दोष देऊन अन्न संकट सुटणार नाही." असे मत व्यक्त केले आहे. (China Media Support India In Wheat Export Ban )

हेही वाचा: केतकी चितळे प्रकरणात पोलीस तपासात महत्वाची माहिती समोर

तर, ग्लोबल टाईम्सने (Global Times) म्हटले आहे की, "आता G7 देशांचे कृषी मंत्री भारताला आवाहन करत आहेत की, भारताने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालू नये. मग G7 देश स्वतःच त्यांची निर्यात वाढवून अन्न बाजाराचा पुरवठा संतुलित का करत नाहीत? .?" असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच काही पाश्चात्य देशांनी संभाव्य जागतिक अन्न संकट लक्षात घेऊन गव्हाची निर्यात कमी करण्याचा निर्णय घेतल्यास भारतावर टीका करण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले आहे. कारण भारतावर आधीच अन्न पुरवठ्याचे संरक्षण करण्यासाठी दबाव असल्याचे मत ग्लोबल टाईम्सने व्यक्त केले आहे.

जरी भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा गहू उत्पादक देश असला तरी, जागतिक गहू निर्यातीत भारताचा वाटा फारच कमी आहे. याउलट, यूएस, कॅनडा, युरोपियन युनियन आणि ऑस्ट्रेलियासह काही विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये, हे देश जगातील सर्वात मोठे गहू निर्यातदार असल्याचे मतही चिनी माध्यमांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा: आणखी एक दिवस असता तर...साइमंड्सच्या बहिणीचा भावनिक संदेश

निर्यात बंदी! युरोपीयन बाजारपेठेत गव्हाच्या किमती गगनाला भिडल्या

दोन दिवसांपूर्वी गव्हाच्या निर्यातीवर भारत सरकारने निर्बंध लागू केले असून, भारताच्या या निर्णयाचा फटका आंतरराष्ट्रीय स्तरावर जाणवून लागला आहे. दरम्यान, निर्यात बंदीच्या निर्णयानंतर सोमवारी गव्हाच्या किमती विक्रमी उच्चाकांवर पोहचल्या असून, युरोपीयन बाजारात गव्हच्या किमती 435 युरो (453 युरो) प्रति टनवर गेल्या आहेत. त्यामुळे आधीच रशिया-युक्रेन युद्धामुळे महागाईने त्रस्त नागरिकांना आता आणखी झळ बसणार आहे. (Wheat prices hit record high after India export ban)

Web Title: Indias Wheat Export Curb Supported By China Media After G7 Criticism

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top