Rampur : राष्ट्रीय महामार्गावरील बस-ट्रकच्या भीषण अपघातात 5 ठार, 46 जण जखमी

जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
Bus-Truck Accident in Uttar Pradesh Rampur
Bus-Truck Accident in Uttar Pradesh Rampuresakal
Updated on
Summary

जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये (Uttar Pradesh Rampur) राष्ट्रीय महामार्गावर (National Highway) शाहजहानपूर डेपोची बस आणि ट्रकमध्ये भीषण (Bus Truck Accident) अपघात झालाय. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला, तर 46 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात (District Hospital) दाखल करण्यात आलं असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शवागारात ठेवण्यात आले आहेत.

Bus-Truck Accident in Uttar Pradesh Rampur
Indonesia : इंडोनेशियात दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला; हल्ल्यात 10 जण जागीच ठार

दरम्यान, जखमींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे जिल्हा प्रशासनानं त्यांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यासोबत हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. शहाजहानपूर आगाराची (Shahjahanpur Bus) बस रात्री शहाजहानपूरहून दिल्लीला जात होती. यावेळी राष्ट्रीय महामार्गावर ट्रकनं बसला जोरदार धडक दिली. हा अपघात होताच महामार्गावर तैनात 112 आणि सिव्हिल लाईन्स पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला आणि त्यांनी जखमींना रुग्णवाहिकेव्दारे जिल्हा रुग्णालयात नेलं. यादरम्यान पाच जणांचा मृत्यू झालाय.

Bus-Truck Accident in Uttar Pradesh Rampur
Petrol Diesel : विमानाच्या इंधनाचे दर कमी, पेट्रोल-डिझेलही होणार स्वस्त?

जिल्हा दंडाधिकारी रवींद्र कुमार मादंड यांनी अपघाताबाबत सरकारला माहिती देण्यासोबत हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. 9454416995 आणि 9897846204 या क्रमांकावर कॉल करून कोणतीही व्यक्ती या अपघातातील मृत व जखमींची माहिती मिळवू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

80th Independence Day: PM Modi to Hoist National Flag at Red Fort
PM Modi statement on urea subsidy
ranchi pahadi temple independence day flag
PM Modi Red Fort Speech
Marathi News Esakal
www.esakal.com