"रॉकफेलर'च्या अध्यक्षपदी भारतीय वंशाचे राजीव शहा

पीटीआय
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

शहा हे एक ते दोन दिवसांतच ज्युडीथ रॉडिन यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील, असे "न्यूयॉर्क टाइम्स'ने म्हटले आहे. रॉडिन या मागील बारा वर्षांपासून या संस्थेच्या अध्यक्ष होत्या. शहा यांच्या या पदावरील नियुक्तीमुळे अत्यंत नावाजलेल्या आणि वर्षाला साधारण वीस कोटी डॉलर देणगी देणाऱ्या या संस्थेची सूत्रे त्यांच्या हातात येणार आहेत

न्यूयॉर्क - अमेरिकेतील सर्वांत मोठी आणि सर्वांत प्रभावशाली देणगीदार संस्था असलेल्या रॉकफेलर फाउंडेशनच्या अध्यक्षपदासाठी राजीव जे. शहा यांचे नाव जवळपास निश्‍चित झाले आहे. यामुळे ते संस्थेचे सर्वांत तरुण आणि भारतीय वंशाचे पहिले अध्यक्ष ठरतील.

राजीव शहा (वय 43) युनायटेड स्टेट्‌स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटचे (यूएसएआयडी) माजी प्रमुख आहेत. रॉकफेलर फाउंडेशनच्या अध्यक्षपदासाठी नाव निश्‍चित झाल्याचे त्यांनीच ट्‌विटरवरून जाहीर केले आहे. शहा हे एक ते दोन दिवसांतच ज्युडीथ रॉडिन यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील, असे "न्यूयॉर्क टाइम्स'ने म्हटले आहे. रॉडिन या मागील बारा वर्षांपासून या संस्थेच्या अध्यक्ष होत्या. शहा यांच्या या पदावरील नियुक्तीमुळे अत्यंत नावाजलेल्या आणि वर्षाला साधारण वीस कोटी डॉलर देणगी देणाऱ्या या संस्थेची सूत्रे त्यांच्या हातात येणार आहेत.

शंभरहून अधिक जणांमधून शहा यांची निवड करण्यात आल्याचे रॉकफेलर फाउंडेशन मंडळाचे अध्यक्ष रिचर्ड पार्सन्स यांनी सांगितले. शहा हे 2009 ते 2015 या काळात ते "यूएसएआयडी'चे प्रमुख होते. त्यांनी अमेरिकेच्या कृषी विभागात मुख्य शास्त्रज्ञ आणि कनिष्ठ सचिव या पदांवरही काम केले आहे. बिल अँड मेलिंडा गेट्‌स फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेही ते आठ वर्ष कार्यरत होते.

Web Title: Indo-American Rajiv Shah soon to be Rockefeller Foundation President