इंडोनेशियाची राजधानी आता बोर्निया बेटांवर 

इंडोनेशियाची राजधानी आता बोर्निया बेटांवर 

जाकार्ता - जाकार्ता या महानगरात झालेल्या गर्दीमुळे इंडोनेशियाची राजधानी येथून दुसरीकडे हलविण्यावर विचार सुरू असल्याचे तेथील सरकारने म्हटले आहे. इंडोनेशियाची नवी राजधानी पूर्वेकडे असलेल्या बोर्नियो बेटांवर असेल, अशी घोषणा अध्यक्ष जोको विडोडो यांनी आज केली. 

आग्नेय आशियाई द्वीपसमूहाच्या केंद्र बिंदूजवळ असलेल्या बोर्नियो बेटावर मोठ्या प्रमाणात वने आहेत. या बेटावरील सुमारे 180 हजार हेक्‍टर जमीन सरकारी मालकीची आहे. इंडोनेशियातील बालिकपापन आणि समरिंदा शहरांजवळ हे बेट आहे. हे बेट पूर्व कालिमंतान प्रांतात असून, या भागाला नैसर्गिक संकटांचा सर्वांत कमी धोका आहे, असे विडोडो यांनी सांगितले. 

जाकार्तामध्ये सर्व सरकारी विभाग, उद्योग, अर्थ, व्यापार आणि सेवांची केंद्रे आहेत. त्यामुळे या शहरावर मोठ्या प्रमाणात ताण आलेला आहे. त्यामुळे राजधानी येथून हलविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असे ते म्हणाले. नव्या राजधानीसाठीचा प्रस्ताव संसदेकडे पाठविण्यात येणार आहे. 

वेगाने बुडणारे जाकार्ता! 
जाकार्ता हे पाचशे वर्षांपूर्वी डचांनी वसविलेले शहर आहे. 2050 पर्यंत जाकार्ता शहराचा एक तृतीयांश भाग समुद्रात बुडालेला असेल, अशी शक्‍यता पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तसेच, जाकार्तामध्ये जमिनीतून पाण्याच्या खूप मोठ्या प्रमाणात उपसा करण्यात आला आहे. दररोजची वाहतूक कोंडी आणि शहराची वाढती लोकसंख्या यांच्या बरोबरच भूकंप आणि पुराचाही मोठा धोका या शहराला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com