esakal | इंडोनेशियात भूस्खलन, पुरामुळे आतापर्यंत 126 लोकांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

indonesia.

पूर्व इंडोनेशियामध्ये भूस्खलन आणि पुरामुळे हाहाकार माजला आहे. आतापर्यंत देशात १२६ लोकांचा जीव गेला असून अनेकजण बेपत्ता आहेत.

इंडोनेशियात भूस्खलन, पुरामुळे आतापर्यंत 126 लोकांचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

लेम्बाता- पूर्व इंडोनेशियामध्ये भूस्खलन आणि पुरामुळे हाहाकार माजला आहे. आतापर्यंत देशात १२६ लोकांचा जीव गेला असून अनेकजण बेपत्ता आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. देशातील पूर्व भागात सातत्याने मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे मदतकार्यात मोठा अडथळा निर्माण होत आहे. माहितीनुसार, इंडोनेशियाच्या अदोनारा द्वीपच्या पूर्व प्लोरिस जिल्ह्यात सर्वाधिक जीवितहानी झाली आहे. याठिकाणी ६७ लोकांचा मृत्यू झाला असून अनेकजण बेपत्ता आहेत. रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जवळच्या डोंगरावरील गाळ खाली वाहत आला. याखाली अनेक घरे दबले गेले. या घटनेवेळी लोक झोपले होते. त्यामुळे झोपेतच त्यांना मृत्यूने गाठलं. रात्रभर झालेल्या पावसामुळे नदींच्या पाण्याची पातळी वाढली. अचानक आलेल्या पुरामुळे अनेक लोक वाहून गेले आहेत. इंडोनेशियाच्या आपत्ती विभागाने दिलेल्या माहितीनुसार, लेम्बाता द्विपावर आलेल्या 'सेरोजा' चक्रीवादळमुळे पावसाला सुरुवात झाली. यामुळे नोव्हेंबरमध्ये फुटलेल्या ज्वालामुखीच्या लावाच्या प्रवाहाची गती वाढली. याच्या प्रभावाखाली अनेक गावे आली. या घटनेत कमीतकमी २८ लोकांचा मृत्यू झाला आणि ४४ जणांची कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. 

53 कोटी युजर्सचा डेटा लिक झाल्याप्रकरणी फेसबुकचे स्पष्टीकरण

सुरक्षा कर्मचारी आणि अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेत आहे. माहितीनुसार, इंडोनेशियाच्या वेगवेगळ्या द्विपांवरील भूस्खलन आणि पुराच्या घटनेमुळे कमीतमी १२६ लोकांचा बळी गेलाय. अनेक लोक बेपत्ता असून शोधकार्य हाती घेण्यात आले आहे. पूर्व तिमोरमध्ये २७ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. हजारो घरांचं नुकसान झालं असून हजारो लोकांचे विस्थापन करण्यात आले आहे. हवामान आणखीन काही दिवस असंच राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चक्रीवादळ दक्षिणेकडील ऑस्ट्रेलियाकडे जात आहे. या आपत्तीमुळे रस्ते आणि पूलांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. स्थानिकांच्या सहाय्याने मदतकार्य हाती घेण्यात आले आहे. 

loading image