Indonesia Marapi volcano: ज्वालामुखीच्या उद्रेकात ११ गिर्यारोहकांचा मृत्यू, तर तीन जण सापडले जिवंत आणखी १२ जणांचा शोध सुरूच

पश्‍चिम इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक होऊन ११ गिर्यारोहकांचा मृत्यू झाला, अशी माहिती स्थानिक बचावकार्यातील अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले.
Indonesia Marapi volcano
Indonesia Marapi volcanoeSakal

पश्‍चिम इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक होऊन ११ गिर्यारोहकांचा मृत्यू झाला, अशी माहिती स्थानिक बचावकार्यातील अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले.

सुमात्रा बेटावरील माऊंट मारापीच्या नऊ हजार ४८४ फुटांवरील शिखरावर रविवारी (ता.३) ज्वालामुखीचा उद्रेक झाला. त्यातून तीन हजार मीटर उंच राखेचा लोळ आकाशात पसरला. ‘‘या पर्वतावर शनिवारी (ता.२) ७५ गिर्यारोहक गेले होते. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर त्यांची सुटका करण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले. (Latest Marathi News)

४९ गिर्यारोहकांना खाली आणण्यात यश आले असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. बेपत्ता असलेल्या २६ जणांपैकी १४ गिर्यारोहकांचा शोध लागला आहे. त्यापैकी ११ जण मृतावस्थेत आढळले तर तीन जण जिवंत सापडले,’’ असे पडंग शोध आणि बचाव संस्थेचे प्रमुख अब्दुल मलिक यांनी सांगितले. (Marathi Tajya Batmya)

Indonesia Marapi volcano
Khalistani Terrorist Died : खलिस्तानी दहशतवादी लखबीर रोडेचा पाकमध्ये मृत्यू, भारतातील अनेक हल्ल्यांचा होता मास्टरमाईंड

माऊंट मारापीवर ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर गिर्यारोहकांना सुरक्षितपणे खाली आणण्यासाठी बचाव पथक रात्रभर झटत होते, असे पश्‍चिम सुमात्राच्या नैसर्गिक स्रोत संवर्धन संघटनेने सांगितले. पश्चिम सुमात्रा आपत्ती निवारण संघटनेचे प्रमुख रुडी रिनाल्डी म्हणाले, ‘‘ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या तप्त लाव्हारसामुळे काही गिर्यारोहकांना भाजले आहे. त्यांना खाली आणल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. जे जखमी झाले आहेत, ते विवराच्या जवळ होते.’’

विवराभोवतालच्या प्रदेशात प्रवेशबंदी

चार स्तरीय प्रणालीतील दुसऱ्या धोकादायक श्रेणीत माऊंट मारापीचा समावेश होतो. ज्वालामुखीच्या विवराभोवतलच्या तीन किलोमीटरचा परिसरात अधिकाऱ्यांनी प्रवेशबंदी लागू केली आहे. (Marathi Tajya Batmya)

Indonesia Marapi volcano
बायडेन यांना हरवण्यासाठी अमेरिकेतील मुस्लिम सज्ज! काय आहे कारण, कसा पाडणार प्रभाव?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com