भारतात बाल-माता मृत्यू दर वाढण्याची शक्यता

Unicef
Unicef

कोविड-१९ च्या आरोग्य सेवेचा परिणाम; दक्षिण आशियातील देशांवर यूनिसेफचा अभ्यास
न्यूयॉर्क - गेल्यावर्षी कोविड-१९ मुळे आरोग्य सेवावर परिणाम झाल्याने दक्षिण आशियात पाच वर्षापेक्षा कमी वयोगटातील मुलांच्या मृत्यूबरोबरच मातांचेही मृत्यू होण्याचे प्रमाण भारतात सर्वाधिक राहू शकते, असा अंदाज संयुक्त राष्ट्राच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.  यूनिसेफ, जागतिक आरोग्य संघटना आणि संयुक्त लोकसंख्या निधी (यूएनएफपीए) चा ‘दक्षिण आशियात कोविड-१९ आणि उपचाराचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम’ असा अहवाल सादर झाला आहे. हा अहवाल दक्षिण आशियातील सर्वाधिक लोकसंख्येचे अफगाणिस्तान, बांगलादेश, भारत, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंकेवर आधारित आहे. कोविड-१९ मुळे या देशांतील शिशू आणि स्तनदा माता, आरोग्य, आर्थिक रोजगारी आणि शिक्षणावरच्या परिणामाचे आकलन केले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यूनिसेफच्या अहवालात म्हटले, की ऑक्टोबर २०२० आणि सप्टेंबर २०२१ या काळात सर्वाधिक मृत्यू भारतात होऊ शकतात. या सहा दक्षिण आशियायी देशात गेल्या वर्षीच्या तुलनेत २०२० मध्ये पाच वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मृत मुलांचा आकडा २,२८,६४१ पर्यंत पोचण्याचा अंदाज आहे. यात सर्वाधिक मृत्यू भारतात (१५४,०२०) १५ टक्क्यांनी आणि पाकिस्तान (५९,२५१) १४ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. या भागात मृत मुलांच्या जन्म देण्याचे प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे. कोरोना महासाथीमुळे २०२० मध्ये मातृत्व मृत्यू दर देखील वाढण्याचा अंदाज आहे. यात सर्वाधिक मृत्यू भारतात ७७५० तर पाकिस्तानात २०६९ मृत्यू होण्याचा अंदाज आहे. 

लस आली तरी कोरोना पाठ सोडणार नाही; संयुक्त राष्ट्राचा अहवाल
 
अतिदक्षता विभागात अधिक रुग्ण
भारतात रुग्णालय आणि आयसीयूमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची सर्वाधिक संख्या भारताची राहण्याची शक्यता आहे. कोविड-१९ कारणामुळे यौन, प्रजनन, मातृत्व आणि शिशूच्या आरोग्य सेवेवर परिणाम होत असल्याने बाल माता मृत्यू दरावर अधिक परिणाम होण्याची शक्यता आहे.

भारतात कोविडवर १० अब्ज डॉलर खर्च
संयुक्त राष्ट्राच्या अहवालात म्हटले, भारतात सप्टेंबर २०२१ पर्यंत कोविड-१९ ची तपासणी आणि उपचारासाठी सुमारे १० अब्ज डॉलर खर्च करू शकतो. म्हणजेच ७.८ अब्ज डॉलर चाचणीवर आणि १.७ अब्ज डॉलर उपचारावर खर्च होतील. या क्षेत्रातील हा सर्वाधिक खर्च मानला जात आहे. फेब्रुवारी २०२१ पर्यंत दक्षिण आशियात १.२ कोटी नागरिक कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आणि त्यापैकी १ कोटी ९ लाखाहून अधिक रुग्ण भारतातील होते.

कोरोना होणार मोसमी आजार
जगभरात कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत असताना संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालानुसार कोरोना हा लवकरच मोसमी आजाराचे रुप धारण करू शकतो, असे म्हटले आहे. चीनच्या वुहानमधून कोरोनाचा प्रसार सुरू झाला आणि तो जगभरात पसरला. वर्षभरानंतरही शास्त्रज्ञ या आजाराचे गूढ उकलू शकले नाहीत. तज्ञांच्या एका गटाने कोरोनाच्या प्रसारासंदर्भात माहिती गोळा करण्यासाठी हवामान शास्त्र आणि हवेतील गुणवत्तेचे अध्ययन केले. यात कोविड-१९ आता मोसमी आजाराप्रमाणे आगामी काही काळ त्रास देऊ शकतो, असे म्हटले आहे. जागतिक हवामान संघटनेने नेमलेल्या १६ सदस्यीय टीमने म्हटले की, श्‍वासासंबंधीचा संसर्ग हा प्रामुख्याने मोसमी असतो. हवामान बदलताच हा संसर्ग वाढतो. कोरोनाने देखील हवामान आणि वातावरणानुसार आपला प्रभाव दाखवला. जर पुढील अनेक वर्ष हा असाच त्रास देत राहिला तर तो एक गंभीर आजार म्हणून समोर येईल.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com