चीनच्या लढाऊ विमानांची पुन्हा घुसखोरी; तैवानच्या ADIZ मध्ये दाखल

 J-16 fighter
J-16 fighter J-16 fighter

तैवान : दोन चिनी (China) लष्करी विमानांनी बुधवारी (ता. २३) तैवानच्या हवाई संरक्षण ओळख झोनमध्ये (ADIZ) प्रवेश केला. या महिन्यात चीनने १२ वेळा घुसखोरी केली आहे. तैवानने वर्षातून अनेक वेळा चीनद्वारे आपल्या हवाई क्षेत्राच्या अतिक्रमणाची तक्रार केली आहे.

दोन पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्स (पीएलएएएफ) शेनयांग जे-१६ लढाऊ विमानांनी तैवानच्या (Taiwan) हवाई संरक्षण ओळख झोनच्या नैऋत्य कोपऱ्यात उड्डाण केले. राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयाने (MND) प्रत्युत्तर म्हणून तैवानने विमाने पाठवली. तसेच रेडिओ चेतावणी जारी केली. PLAAF विमानांचे निरीक्षण करण्यासाठी हवाई संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात केली आहे.

 J-16 fighter
रशियाची अचूक रणनीती : तीन बाजूंनी सैन्य तर चौध्या बाजूने...

चीनने (China) आतापर्यंत एकूण ४० लष्करी विमाने (Fighter Jets) तैवानच्या ओळख क्षेत्रात पाठवली आहेत. ज्यात २२ लढाऊ विमाने, १७ स्पॉटर विमाने आणि एका हेलिकॉप्टरचा समावेश आहे. सप्टेंबर २०२० पासून चीनने तैवानच्या (Taiwan) हवाई संरक्षण ओळख झोनमध्ये नियमितपणे विमाने पाठवून ग्रे झोन युक्ती वाढवली आहे. बहुतेक घटना नैऋत्य कोपऱ्यात घडत आहेत. MND नुसार २०२१ मध्ये चीनच्या लष्करी विमानांनी ९६१ वेळा तैवानच्या हवाई संरक्षण ओळख झोनमध्ये प्रवेश केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com