चीनमधील कोरोनाग्रस्तांना मारण्याबाबतचे 'ते' वृत्त खोटे

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

बीजिंग : चीनमधील कोरोनाग्रस्तांना मारण्याची चीन सरकारने न्यायालयाकडे मागणी केल्याचे वृत्त खोटे असून, कालपासून ही माहिती व्हायरल होत आहे. कोरोना विषाणूंच्या संसर्गाला रोखण्यासाठी चीन आता अघोरी मार्गाचा अवलंब करणार असून यान्वये हा संसर्ग झालेल्या 20 हजार रूग्णांना ठार मारले जाणार आहे, अशी खोटी माहिती सर्व माध्यमांमध्ये व्हायरल होत असून सद्यस्थिती अशी नाही. कोरोनाग्रस्तांवर व्यवस्थित उपचार सुरू असून, या आजाराशी चीन लढा देत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चीनमधील सर्वोच्च न्यायालय असणारे सुप्रीम पीपल्स कोर्ट हे आज (ता. ७) सामूहिक हत्येला परवानगी देऊ शकते अशी माहिती व्हायरल झाली होती. चीन सरकारनेच न्यायालयाकडे ही मागणी केली असल्याचे एका संकेतस्थळाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हणले होते, पण खरी परिस्थिती अशी नसून अशा प्रकारचा कोणताही अघोरी निर्णय चीन सरकार घेणार नसल्याचे समजते. 

हॉस्पिटल्स अपुरी पडू लागली, तरीही लढा सुरूच
सर्वसामान्य रूग्णांप्रमाणेच त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर आणि अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांनाही या विषाणूंचा संसर्ग होऊ लागला असून आतापर्यंत वीस डॉक्टर याला बळी पडले असल्याची माहिती चीन सरकारकडून न्यायालयास देण्यात आली. हुबेई प्रांतातील ६७ टक्के लोकांना या विषाणूचा संसर्ग झाला असून त्यांना ठेवण्यासाठी रूग्‍णालये देखील अपुरी पडू लागली आहेत. कोरोनाच्या लढ्यासाठी अनेक शहारांमध्ये नवीन हॉस्पिटलची निर्मिती केली जात आहे.

अरेरे! कोरोनाचा शोध लावलेल्या डॉक्टरचाच दुःखद अंत

कोरोनाचा शोध लावलेल्या डॉक्टरचाच दुःखद अंत
कोरोनाची प्रथम लक्षणे या डॉ. ली वेनलियांग यांना दिसली होती. यावरून त्यांनी कोरोना व्हायरसची चीनमध्ये लागण झाल्याची माहिती दिली होती. पण दुर्दैव म्हणजे याच कोरोनाने ली यांचा जीव घेतला. चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेने ही माहिती दिली. डॉ. ली वेनलियांग यांच्यासह आठ जणांनी चीनमध्ये कोरोना विषाणू पसरत असून हा आजार जीवघेणा असल्याचे जाहीर केले होते. पण भयंकर प्रकारे पसरलेल्या कोरोनाने चक्क डॉक्टर ली यांनाच आपल्या विळख्यात अडकवले.  इतर डॉक्टरांनी त्यांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र त्याला अपयश येऊन वुहान येथे ली यांचा मृत्यू झाला आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: information of planning of killing corona patients in china is wrong