नासाचे 'इनसाइट' यान पोहोचले मंगळावर

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 नोव्हेंबर 2018

नासाचे इनसाइट (इंटरिअर एक्सप्लोरेशन यूजिंग सिस्मिक इन्व्हेस्टिगेशन) यान मंगळ ग्रहावर उतरले आहे. सोमवार आणि मंगळवारच्या दरम्यान भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 1 वाजून 24 मिनिटांनी इनसाइट यान मंगळ ग्रहावर उतरले. मंगळ ग्रहावरील रहस्य जाणून घेण्यासाठी हे यान बनवण्यात आले आहे.

न्यूयॉर्क- नासाचे इनसाइट (इंटरिअर एक्सप्लोरेशन यूजिंग सिस्मिक इन्व्हेस्टिगेशन) यान मंगळ ग्रहावर उतरले आहे. सोमवार आणि मंगळवारच्या दरम्यान भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 1 वाजून 24 मिनिटांनी इनसाइट यान मंगळ ग्रहावर उतरले. मंगळ ग्रहावरील रहस्य जाणून घेण्यासाठी हे यान बनवण्यात आले आहे.
 

ग्रहाच्या पृष्ठभागावर यान उतरताना 19800 कि.मी. प्रति तास वेगाने जाणारे हे यान सहा मिनिटांत शून्य वेगावर आले. त्यानंतर यान पॅराशूटमधून बाहेर आले आणि लँड झाले. दरम्यान, इनसाइटने मंगळ ग्रहावरुन आपले पहिले छायाचित्रही पाठवले आहे.

 

मंगळ ग्रहावरील रहस्य जाणून घेण्यासाठी हे यान तयार करण्यात आले आहे. सहा महिन्यांच्या प्रवासानंतर इनसाइटने मंगळावर लँड केले. नासाच्या या प्रकल्पासाठी 1 बिलियन डॉलर म्हणजेच 70 अब्ज रुपये खर्च आला आहे. सौर ऊर्जा आणि बॅटरीने ऊर्जा मिळवणाऱ्या लँडरला 26 महिन्यांपर्यंत संचलित केले जाऊ शकते. परंतु, नासाला यापेक्षा अधिक कालावधी ते सुरू राहू शकेल अशी अपेक्षा आहे.
 

नासाने म्हटले आहे की, इनसाइट यान पृष्ठभागावर 10 ते 16 फुट खोल खड्डा करेल. यापूर्वीच्या मंगळ अभियानांच्या तुलनेत हे 15 टक्के अधिक खोल असेल. 2030 पर्यंत मनुष्याला मंगळावर पाठवण्याच्या प्रयत्नासाठी नासाला मंगळ ग्रहाचे तापमान समजणे महत्वाचे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Insight Lander Touches Down On Mars Says Nasa