esakal | Video : विराटच्या 'जबरा फॅन'ने त्याच्यासाठी बनवलं स्पेशल गिफ्ट!
sakal

बोलून बातमी शोधा

Virat-Kohli

गेल्या वर्षी अनेक मालिका विजय साजरे केल्यानंतर आजपासून नव्या वर्षातील मोहिमेस टीम इंडिया सामोरी जात आहे.

Video : विराटच्या 'जबरा फॅन'ने त्याच्यासाठी बनवलं स्पेशल गिफ्ट!

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

गुवाहाटी : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचे जगभरात असंख्य चाहते आहेत. 'रणमशिन' म्हणून ओळख असलेल्या विराटचे तितकेच जबरदस्त चाहतेही आहेत. आपल्या रोल मॉडेलसाठी चाहते काय करतील याचा नेम नाही. आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी प्रत्येकजण काहीतरी स्पेशल बनवत असतो. अशाच विराटच्या एका जबऱ्या फॅनने त्याच्यासाठी एक स्पेशल गिफ्ट बनवलं आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आज कॅप्टन कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध टी-20 सामना खेळत आहे. गुवाहाटी येथे होत असलेल्या या सामन्याआधी विराटच्या चाहत्याने त्याला एक स्पेशल गिफ्ट दिलं आहे. याचा एक व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केल्याने त्याची सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे. 

- Breaking : इरफान पठाणची क्रिकेटमधून निवृत्ती

गुवाहाटीमध्येच राहत असलेल्या राहुल पारिख या युवा विराट फॅनने जुन्या मोबाईलपासून विराटचं एक पोर्ट्रेट तयार केलं आहे. यासाठी त्याने अनेक मोबाईलच्या वेगवेगळ्या पार्ट आणि वायर्सचा वापर केला आहे. भारतीय संघ गुवाहाटीमध्ये एक सामना खेळणार असल्याची बातमी मिळाल्यानंतर राहुल पारिखने हे पोर्ट्रेट बनवण्याचे ठरवले. आणि सामना सुरू होण्याआधी टीम इंडिया ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी आहे ते हॉटेल गाठले. 

- महाराष्ट्र केसरी 2020 : 'ही तर ऑलिंपिकची शोधमोहीम' : अनिरुद्ध देशपांडे

विराटला एक स्पेशल गिफ्ट द्यायचे आहे, अशी विनंती केल्यानंतर स्वत: विराट त्याला भेटण्यासाठी आला. यावेळी आपला आवडत्या खेळाडूला प्रत्यक्ष भेटतानाचा आनंद राहुलच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. 

- पोट सुटलंय तर दंड भरा; क्रिकेट बोर्डाची कारवाई

गेल्या वर्षी अनेक मालिका विजय साजरे केल्यानंतर आजपासून नव्या वर्षातील मोहिमेस टीम इंडिया सामोरी जात आहे. या वर्षात टीम इंडिया कशी कामगिरी करतेय, याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष्य लागून राहिलं आहे.

loading image