esakal | आंतरराष्ट्रीय पोलिस संघटना 'इंटरपोल' म्हणजे काय? काम कसं चालतं, टार्गेट काय असतं ?
sakal

बोलून बातमी शोधा

interpol.jpg

इंटरपोल ही जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय पोलिस संघटना आहे. ज्यामध्ये 192 सदस्य देश या संस्थेशी जोडले गेले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुन्हेगारीविरोधात एकत्रितरित्या लढण्यासाठी ही यंत्रणा कार्यरत आहे.

आंतरराष्ट्रीय पोलिस संघटना 'इंटरपोल' म्हणजे काय? काम कसं चालतं, टार्गेट काय असतं ?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

इंटरपोल ही जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय पोलिस संघटना आहे. ज्यामध्ये 192 सदस्य देश या संस्थेशी जोडले गेले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुन्हेगारीविरोधात एकत्रितरित्या लढण्यासाठी ही यंत्रणा कार्यरत आहे.

इंटरपोल कशी उदयास आली?

जागतिक स्तरावर अशी एक मजबूत यंत्रणा असावी याकरता मोनाको देशातील आंतरराष्ट्रीय फौजदारी पोलीस संघटनेने १९१४ साली इंटरपोल सारखी यंत्रणा सुरू करण्याचा विचार केला होता. यानंतर १९२३ साली आंतरराष्ट्रीय फौजदारी पोलीस संघटनेची स्थापना अधिकृतरित्या करण्यात आली. जगभरातील १९२ देशांची पोलीस यंत्रणा या इंटरपोल संस्थेशी जोडली केली असून १९५६ साली इंटरपोल नावाने ही संस्था पुढे नावारुपास लागली. आणि मग इंटरपोलचे मुख्यालय फ्रांसमधील लिऑन येथे उभारण्यात आले. त्याचे सध्याचे अध्यक्ष "मेंग हॉन्ग्वे" हे आहेत.

हेही वाचा - नांदगाव हत्याकांडाचे गुढ अखेर उलगडले! नऊ महिने अन् दिडशे जबाबानंतर पोलिसांना यश

इंटरपोलची कार्ये काय आहेत?
इंटरपोलच्या माध्यमातून गुन्ह्यांविरुद्ध लढण्यासाठी 192 सदस्य देशांमधील आंतरराष्ट्रीय पोलिसांना एकत्र आणून काम करण्यास सक्षम करते. हे प्रामुख्याने या तीन प्रकारच्या गुन्ह्यांकरिता पोलिस कौशल्य आणि क्षमता वापरते.  आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीचा मुकाबला करण्यासाठी इंटरपोल ही सर्व सदस्य देश आणि संयुक्त राष्ट्र आणि युरोपियन युनियन सारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांच्या संयुक्त विद्यमाने कार्य करते.
1. दहशतवादविरोधी
2. संघटित गुन्हा
3. सायबर गुन्हे

इंटरपोलची मुख्य कामे कोणती?
इंटरपोलने जागतिक स्तरावर त्यांची एक पोलीत संचार प्रणाली निर्माण केली आहे. ज्याच्या माध्यमातून 'आय- 24/7' या नावाने ती ओळखली जाते. यामध्ये कोणत्याही सभासद असलेल्या देशाला सुरक्षितरित्या डाटा मिळवणे तसेच जमा करून देणे याची सोय उपलब्ध असते. इंटरपोलमध्येच Liaison Bureau (LB) या संघटनेचाही समावेश असतो. देशातील मुख्य अधिकारी एलबीच्या माध्यमातून इंटरपोलची सुविधा मिळवू शकतात.

हेही वाचा - जेव्हा लसीकरण केंद्रावर पोचला 'कोरोनाबाधित'..! उपस्थितांमध्ये पळापळ आणि खळबळ


पोलिसांकरीता ऑपरेशनल डेटा सर्व्हिसेस व डेटाबेस
'आय- 24/7' डेटाबेसद्वारे सदस्य देशांना जेव्हा आवश्यक असेल तेव्हा हा डेटा थेट इंटरपोलकडून मिळू शकतो. येथे सुरक्षा दलांसह सदस्य देशांकडे विस्तृत डेटाबेस, चोरी केलेली मोटार वाहने, चोरी आणि हरवलेली कागदपत्रे, नाममात्र डेटा, डीएनए प्रोफाइल, बनावट पेमेंट कार्ड आणि फिंगरप्रिंट्स याची माहिती पोलीसांना मिळू शकते.

जागतिक गुन्हेगारांविरोधात नोटीस बजावणे
इंटरपोल आंतरराष्ट्रीय सूचनांच्या प्रणालीद्वारे गुन्हेगारीशी संबंधित गंभीर आणि महत्वाची माहिती संग्रहित असते. इंटरपोलचे जनरल सचिवालयातर्फे (आयपीएसजी) हे चार अधिकृत भाषांमध्ये म्हणजेच इंग्रजी, फ्रेंच, अरबी आणि स्पॅनिश सदस्य देशांच्या विनंतीनुसार नोटीस बजावण्यात येते


संघटित व गुन्हेगारीवर आळा बसविणे
संयुरित्या केलेला गुन्हा, गुन्ह्यांचे नेटवर्क, अनधिकृत व्यवहार यांना संपुष्टात आणण्यासाठी तसेच कमकुवत समुदायाच्या रक्षणासाठी इंटरपोल ही संस्था कार्यरत असते. जगभरातील गुन्हेगारांना पकडण्यासाठी इंटरपोल 7 प्रकारच्या नोटीस बजावते. मुंबई बॉम्बस्फोट मालिकेचा आरोपी दाऊद इब्राहिमला अटक करण्यासाठी भारत सरकार इंटरपोलची मदत घेत असल्याची माहिती मिळत आहे.

काउंटर टेररिझम ऑपरेशन्स
आंतरराष्ट्रीय दहशतवादाविरूद्ध जागतिक एकता आणि जगभरातील रासायनिक हल्ले, जैविक हल्ला, रेडिओलॉजिकल अ‍ॅटॅक, न्यूक्लियर अटॅक या विषयावर उपाययोजना करणे ही इन्ट्रपोलची मुख्य कामे आहे.

सायबर गुन्हे
21 व्या शतकातील नवीन प्रकारचे आव्हान म्हणजे सायबर गुन्हेगारी. जगभरात सायबर गुन्ह्याशी संबंधित बर्‍याच घटना घडत आहेत. अलीकडेच रॅन्समवेअर हल्ल्यामुळे संपूर्ण जगभरात बर्‍याच संघटनांचे सिस्टम हॅक करून जगाला हादरवून सोडले

loading image