ISS : आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन धोकादायक अन् अनफीट; रशियाचा दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

International space station see your eye

आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन धोकादायक अन् अनफीट; रशियाचा दावा

नवी दिल्ली : अवकाशातील आंतरराष्ट्रीय स्पेश स्टेशन (ISS) हे धोकादायक स्थितीत आणि अनफीट असल्याचं रशियानं म्हटलं आहे. महिन्याभरापूर्वी हे स्टेशन बंद करण्याची घोषणा केल्यानंतर रशियानं हा दावा केला आहे. दरम्यान, रशिया चीन प्रमाणं स्वतःच स्वतंत्र स्पेश स्टेशन तयार करण्याच्या प्रयत्नात आहे.

हेही वाचा: देशविरोधी कारवायांसाठी वापर झाल्यास मदरशे उद्ध्वस्त करू; 'या' मुख्यमंत्र्यांचा इशारा

रशियन स्पेस एजन्सी रेस्कोसमोसचे प्रमुख युरी बोरिसोव्ह यांनी म्हटलं की, आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमधील उपकरणं निकामी झाली आहेत. तसेच इथल्या जुन्या झालेल्या काही भागांमुळं इथं काम करणाऱ्या क्रू ची सुरक्षितता धोक्यात आली आहे. महिन्याभरापूर्वी रशियानं आपण स्वतंत्र स्पेस स्टेशन उभारणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता रशियानं स्पेस स्टेशनबाबत हे विधान केलं आहे. रशिया अवकाशातील झिरो ग्रॅव्हीटीमध्ये चीनप्रमाणं स्पेस स्टेशन उभारणार आहे.

हेही वाचा: नवजात बालकांचं होणार न्युमोनियापासून संरक्षण; Biological E च्या लशीची शिफारस

"तांत्रिकदृष्ट्या ISS नं आपली सर्व वॉरंटी कालावधी ओलांडल्या असून हे धोकादायक आहे. उपकरणं निकामी होण्याची स्थिती ही हिमस्खलनासारखी आहे. त्यामध्ये क्रॅक दिसू लागले आहेत," असं रॉयटर्सनं बोरिसोव्हच्या हवाल्यानं हे म्हटलं आहे. पुढं त्यांनी म्हटलं की, रशियाचं स्पेस स्टेशन हे पृथ्वीच्या ध्रुवाभोवती प्रदक्षिणा घालेल, ज्यामुळं ते रशियाच्या विस्तीर्ण भूभागाकडे पाहण्यास आणि वैश्विक किरणोत्सर्गावर नवीन डेटा गोळा करण्यास सक्षम असेल.

Web Title: International Space Station Is Dangerous And Unfit Says Russia

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..