
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने आता मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने जगभरात खळबळ उडाली आहे. तेल व्यापाराच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली होर्मुजची सामुद्रधुनी बंद करण्याच्या प्रस्तावाला इराणच्या संसदेनं मंजुरी दिलीय. इराणच्या सरकारी माध्यमांनी रविवारी याबाबत माहिती दिली. इराणचे नॅशनल सिक्युरीटी काउन्सिलचे सदस्य मेजर जनरल कोवसारी यांनी सांगितलं की, इराणच्या वरिष्ठ सुरक्षा प्राधिकरण, सुप्रीम नॅशनल सिक्युरीटी काउन्सिलकडून आता या निर्णयावर शिक्कामोर्तब करणं बाकी आहे.