

Human Rights Violations Iran
esakal
Human Rights Violations Iran: इराणमधील बलुचिस्तान प्रदेशात मानवी हक्कांच्या उल्लंघनाचे विश्लेषण करणाऱ्या ‘बलुच अॅडव्होकसी अँड स्टडीज सेंटर’च्या (बीएएससी) एका नवीन अहवालात बलुच अल्पसंख्याकांविरुद्ध सरकारपुरस्कृत हिंसाचार भयंकर प्रमाणात सुरू असल्याचे नमूद केलेआहे. यामागे पाकिस्तान आणि इराणदरम्यान असलेल्या द्विपक्षीय आर्थिक आणि सुरक्षा संबंधांचा अप्रत्यक्ष हात असल्याचेही या अहवालात नमूद केले आहे.
‘बलुचिस्तान - इराणमधील मानवी हक्क उल्लंघनांच्या प्रकारांचे विश्लेषण’ या अहवालात न्यायालयीन हत्याकांड, सामूहिक अटक आणि पद्धतशीर भेदभावाचे दस्तावेजीकरण केले आहे. ज्यामुळे हा प्रांत देशातील सर्वात लष्करी वर्चस्व असलेल्या प्रदेशांपैकी एक झाला आहे.