

SG Pipers captains, Jarmanpreet Singh, Navneet Kaur,
Sakal
हॉकी इंडिया लीगच्या सिझन २ साठी एसजी पायपर्सने आपल्या नेतृत्व गटाची घोषणा केली असून देशातील दोन अनुभवी ऑलिम्पियनवर विश्वास ठेवला आहे. बचावपटू जर्मनप्रीत सिंग पुरुष संघाचे नेतृत्व करणार आहेत, तर ऑस्ट्रेलियन मिडफिल्डर काई विलॉट उपकर्णधार म्हणून काम पाहतील.
महिला संघात स्टार फॉरवर्ड नेवनीत कौर ही पुन्हा एकदा कर्णधारपद सांभाळणार असून ऑस्ट्रेलियाची केटलिन नॉब्स, जी या सिझनमध्ये पहिल्यांदाच पायपर्समध्ये खेळणार आहे, ती उपकर्णधारपदाची धुरा सांभाळेल.