

Iranian authorities have executed Hossein Padran
esakal
इस्रायलला संवेदनशील लष्करी माहिती पुरवल्याच्या आरोपावरून इराणमध्ये एका नागरिकाला फाशी देण्यात आली आहे. इराणी न्यायव्यवस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, हुसेन पाद्रान यांच्यावर हेरगिरी आणि परकीय गुप्तचर संस्थांना माहिती पुरवल्याचे आरोप ठेवण्यात आले होते. इसफाहान प्रांतातील संवेदनशील लष्करी ठिकाणांशी संबंधित माहिती इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादला पुरवल्याचा त्यांच्यावर आरोप होता.