

Hormuz Strait importance for India oil imports
esakal
India fuel reserve 45 days : इराणने ‘होर्मुझ’ची सामुद्रधुनी बंद केल्याने जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूची खरेदी करणाऱ्या भारताला याचा आगामी काळात तडाखा बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान सध्या भारताकडे सुमारे ४० ते ४५ दिवस पुरेल इतकाच कच्च्या तेलाचा साठा असल्याची माहिती कमोडिटी बाजारावर लक्ष ठेवणाऱ्या ‘केपलर’ या संस्थेकडून देण्यात आली आहे.