Iran-Israel Tensions
esakal
इराण आणि इस्रायल यांच्यातील तणाव पुन्हा वाढण्याची चिन्हं दिसत आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इराणमधील सत्ताधाऱ्यांना हटवण्याचा इशारा दिल्यानंतर इराणकडूनही आक्रमक प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. इराणच्या संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण समितीचे प्रमुख इब्राहिम अजीजी यांनी, इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि हितांवर हल्ला झाल्यास इस्रायलला एका तासापेक्षाही कमी वेळात राहण्यायोग्य ठेवणार नाही, असा इशारा दिला आहे. अजीजी यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.