Iran Israel War : इराण आणि इस्रायल यांच्यातील दीर्घकालीन तणावाने आता थेट युद्धाचे रूप धारण केले असून संपूर्ण जग या घडामोडीकडे गंभीरपणे पाहत आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी (Ayatollah Ali Khamenei) यांनी अधिकृतपणे जाहीर केले आहे, की 'हे युद्ध आता सुरू झाले आहे.' दरम्यान, अमेरिका इस्रायलच्या बाजूने उभी असून इराणवर हल्ला करण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर येत आहे.