Diego Garcia Base Targeted By Iran
esakal
गेल्या २० दिवसांपासून इराण–इस्त्रायल–अमेरिका यांच्यात संघर्ष सुरू असून त्यामुळे मध्यपूर्वेत तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर इराणने नुकताच हिंद महासागरातील एका बेटावर क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या संघर्षाची धग आता भारतापर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे. इराणने हिंद महासागरातील डिएगो गार्सिया येथील अमेरिका–ब्रिटनच्या महत्त्वाच्या लष्करी तळाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला; मात्र हा हल्ला अयशस्वी ठरल्याचे सांगितले जात आहे. इराणने या बेटावर दोन मध्यम पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली.