Middle East War
Middle East Warsakal

Middle East War : पश्‍चिम आशियावरील युद्धछाया गडद ; इराण हल्ल्याच्या तयारीत

सीरियातील दमास्कस येथील इराणी दूतावासावर इस्रायली लष्कराने केलेल्या हल्ल्यानंतर पश्चिम आशियातील तणाव वाढला आहे.

दुबई : सीरियातील दमास्कस येथील इराणी दूतावासावर इस्रायली लष्कराने केलेल्या हल्ल्यानंतर पश्चिम आशियातील तणाव वाढला आहे. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी इराणनेही इस्राईलवर प्रतिहल्ला करण्याचा इशारा दिल्यानंतर अमेरिकेसह अन्य देश सावध झाले आहेत. इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड’ने होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ एका इस्रायली अब्जाधीशाचे जहाज ताब्यात घेतले.

त्या जहाजावर २५ कर्मचारी होते त्यातील सतरा जण भारतीय नागरिक असल्याची माहिती उघड झाली आहे. हे जहाज सोडा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा थेट इशाराच इस्राईलकडून इराणला देण्यात आला आहे. पुढील चोवीस तासांमध्ये इराणकडून कधीही हल्ला होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Middle East War
Rahul Gandhi : हे सरकार जनतेचे नव्हे, अदानींचे ; साकोलीतील सभेतून राहुल यांचा घणाघात,शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचीही ग्वाही

तसे झाले तर आखातामध्ये युद्धाचा भडका उडेल. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी आज या हल्ल्याची भीती जाहीरपणे बोलून दाखवितानाच इराणला यापासून दूर राहण्याचा इशारा दिला. अमेरिकेच्या युद्धनौका आणि विनाशिकांनी भूमध्य समुद्राच्या दिशेने कूच करायला सुरूवात केली आहे. ‘एअर इंडिया’ने इराणच्या हवाई हद्दीमध्ये न जाण्याच्या सूचना वैमानिकांना केल्या आहेत. अमेरिकी नौदलाच्या दोन विनाशिका या भूमध्य समुद्राच्या दिशेने निघाल्या असून त्यात ‘यूएसएस कार्ने’ या विनाशिकेचा समावेश असून तिनेच लाल समुद्रातील हुथी बंडखोरांच्या कारवायांचा बिमोड केला होता.

हेलिकॉप्टरमधून जहाजावर

इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड’ने होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ संयुक्त अरब अमिरातीच्या किनाऱ्यावरून इस्राईलशी संबंधित मालवाहू जहाज ताब्यात घेतल्याने मोठा तणाव निर्माण झाला आहे. हे जहाज भारताच्या दिशेने येणार होते असे बोलले जाते.

इराणचे सैनिक हेलिकॉप्टरमधून या जहाजावर उतरल्याचे समजते. पोर्तुगालचा ध्वज असलेले ‘एमएससी ॲरिस’ हे जहाज लंडनमधील ‘झोडियाक मेरिटाईम’ या कंपनीचे असल्याचे समजते. ही कंपनी इस्रायली अब्जाधीश इयाल ओफेर यांच्या मालकीची आहे. कंपनीच्या व्यवस्थापनाने मात्र यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे. इराण २०१९ पासून सातत्याने मालवाहू जहाजांना लक्ष्य करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com