असं काही बोलणं झालंच नाही! ट्रम्प यांचा दावा इराणने फेटाळला, घाबरलेल्या अमेरिकेचा वेळकाढूपणा

Iran US War अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत चर्चा सुरू असून पुढचे ५ दिवस हल्ले न करण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं होतं. मात्र इराणने अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा सुरू नसल्याचं म्हटलंय.
Trump Claim on Iran Talks Rejected Tehran Calls It False Narrative

Trump Claim on Iran Talks Rejected Tehran Calls It False Narrative

Esakal

Updated on

गेल्या २४ दिवसांपासून सुरू असलेल्या इराण अमेरिका युद्धाला पूर्णविराम मिळण्याचे संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर इराणसोबत सकारात्मक चर्चा सुरू असून पुढचे पाच दिवस कोणत्याही ऊर्जा प्रकल्पावर अमेरिका हल्ला करणार नाही असं सांगितलं होतं. यात असाही इशारा दिला होता की, हल्ला न करण्याचा निर्णय हा इराण पुढे कशी चर्चा करते त्यावर अवलंबून आहे. दरम्यान, ट्रम्प यांच्या या दाव्यांना इराणने फेटाळून लावलं आहे. असं बोलणंच झालं नसल्याचं इराणने म्हटलंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com