
इराण आणि इस्रायल यांच्यात १२ दिवसांच्या संघर्षानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा केलीय. मात्र या घोषणेनंतर काही वेळातच इऱाणने शस्त्रसंधी फेटाळून लावली आहे. इराणने म्हटलं की, इस्रायल आणि इराण यांच्यात शस्त्रसंधीबाबत अंतिम करार झालेला नाही. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी ट्रम्प यांच्या दाव्यावर बोलताना सांगितलं की, इस्रायल आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी किंवा लष्करी कारवाई रोखण्यासाठी कोणत्याही करारावर एकमत झालेलं नाही.