इराण म्हणतंय, 'आम्ही अमेरिकेचे 80 दहशतवादी ठार केले'

वृत्तसंस्था
बुधवार, 8 जानेवारी 2020

इराणने दावा केलाय की, त्यांनी अमेरिकेच्या 80 दहशतवाद्यांना ठार केले आहे. अल् जजीराने ही माहिती स्पष्ट केली आहे. 

बगदाद : इराणच्या सैन्याकडून आज (ता. 8) पहाटे साडेपाचच्या दरम्यान इराकमधील अमेरिकेच्या दोन लष्करी तळांवर हल्ले करण्यात आले. इराणकडून तब्बल 15 बॅलेस्टीक मिसाईलने अमेरिकेच्या तळांवर हल्ला करण्यात आला असल्याची माहिती अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय पेंटागॉनकडून स्पष्ट करण्यात आली. त्यानंतर इराणने दावा केलाय की, त्यांनी अमेरिकेच्या 80 दहशतवाद्यांना ठार केले आहे. अल् जजीराने ही माहिती स्पष्ट केली आहे. 

Video : इराणचा अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला; कासीम सुलेमानींच्या हत्येचा घेतला बदला

इराणचे कमांडर कासीम सुलेमानी यांच्या हत्येचा बदला म्हणून इराणने हा हल्ला केल्याचे इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीने सांगितले. तसेच आमचे कोणतेही मिसाईल पाडण्यात आलेले नाही, सर्व मिसाईलने यशस्वीपणे हल्ला केल्याचेही इराणने सांगितले आहे. अमेरिकेने सांगितलेल्या माहितीनुसार त्यांच्या हवाई दलाने एक मिसाईल पाडले, पण इराणने असे काहीही न झाल्याचे स्पष्ट केले. 

 

Baghdad Airstrike : ट्रम्प यांनी प्लॅन करत केला इराणच्या कमांडरचा खात्मा

इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डच्या अधिकाऱ्यांच्या सूत्रांनी सांगितले की, अमेरिकेने प्रतिहल्ला केल्यास इराणने आणखी 100 हवाई तळांवर हल्ला करण्याचे नियोजन केले आहे. आज इराणने अमेरिकी तलांवर केलेला हा हल्ला कमांडर कासीम सुलेमानी यांच्या हत्येचा बदला म्हणून करण्यात आल्याची शक्यता आहे.

या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केले आहे की, 'ALL IS WELL. इराणने अमेरिकेच्या दोन सैन्य तळांवर मिसाईल हल्ला केला आहे. आम्ही सर्वशक्तीमान व शक्तिशाली आहेत. जगात कोणापेक्षाही ताकदवान लष्कर आमच्याकडे आहे. यावर उद्या सकाळी आम्ही बोलू.' त्यामुळे उद्या ट्रम्प काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

इराकमधील इरबिल, अल् असद या अमेरिकेच्या लष्करी तळांवर हा हल्ला झाल्याची माहिती अमेरिकेने दिली होती. मात्र अमेरिकेने अद्यापही त्यांचे किती सैनिक ठार झाले याची माहिती उघड केले नाही. पण इराणच्या म्हणण्यानुसार त्याने अमेरिकेचे 80 सैनिक ठार केले आहेत. इराणने हा हल्ला स्वसंरक्षणासाठी व देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी केला. युएनच्या आर्टीकल 15 नुसारच हा हल्ला करण्यात आला. आम्हाला युद्ध पुकारायचे नाही, पण आम्हाला स्वसंरक्षणाची गरज असल्याचे, इराणचे परराष्ट्र मंत्री जावेद जरीफ यांनी सांगितले. या हल्ल्यानंतर अमेरिकेच्या हवाई दलाला इराण, इराक व आखाती देशांमध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Iran says 80 American terrorists killed in missile strikes on US targets in Iraq