esakal | पंजशीरच्या युद्धात उतरणाऱ्या पाकिस्तानला इराणने फटकारलं, चौकशीची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

imran khan

पंजशीरच्या युद्धात उतरणाऱ्या पाकिस्तानला इराणने फटकारलं, चौकशीची मागणी

sakal_logo
By
दीनानाथ परब

तेहरान: अफगाणिस्तानच्या (Afganistan) अंतर्गत विषयात हस्तक्षेप करणाऱ्या पाकिस्तानला इराणने फटकारलं आहे. पंजशीर खोऱ्यात (Panjshir valley) पाकिस्तानी लष्कराच्या (Pakistan army) उपस्थितीबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना इराणने (Iran) पाकिस्तानवर जोरदार टीका केली. पंजशीरमध्ये लढणाऱ्या रेसिस्टन्स फोर्सला कुठलीही मानवीय मदत मिळू नये, यासाठी तालिबानमे पंजशीर खोऱ्याकडे जाणारे मार्ग बंद केले होते. त्याविरोधात आवाज उठवणारा इराण पहिला देश ठरला आहे.

लष्करी कारवाईऐवजी चर्चा करण्याचे इराणने आवाहन केले आहे. "काल रात्री झालेल्या हल्ल्याचा आम्ही अत्यंत कठोरपणे निषेध करतो. परकीय हस्तक्षेपाची चौकशी झालीच पाहिजे. आम्ही चौकशी करत आहोत" असे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सईद खातीबझादेह यांनी सांगितले. तालिबानने पंजशीर खोऱ्यावर नियंत्रण मिळवल्याचा दावा केला आहे.

हेही वाचा: स्मृती इराणींनी माटुंग्याच्या हॉटेलमध्ये डोशावर मारला ताव

अहमद मसूद आणि माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांच्या नेतृत्वाखाली रेसिस्टन्स फोर्स इथे लढाई लढत आहे. दोन्ही बाजुंनी पंजशीर आपल्या नियंत्रणात असल्याचा दावा केला आहे. पंजशीर आपण जिंकल्याचं तालिबान दावा करत असलं, तरी प्रत्यक्षात त्यांना पाकिस्तानने मदत केल्याची माहिती समोर येत आहे. पाकिस्तानी एअर फोर्सच्या ड्रोन्सचा हवाई हल्ल्यासाठी वापर करण्यात आला आहे.

हेही वाचा: नागपूरमध्ये रुग्णालयाच्या व्हरांड्यातच प्रसृती, बाळाचा मृत्यू

एकप्रकारे अफगाणिस्तानच्या अंतर्गत बाबींमध्ये हा परकीय हस्तक्षेप ठरतो. इराणने तोच मुद्दा उपस्थित करुन पाकिस्तानवर टीका केली आहे. अफगाणिस्तानात पाकिस्तान जाहीरपणे भूमिका बजावताना दिसत आहे. त्यावर इराणने आक्षेप घेतलाय. आयएसएसचे प्रमुख फैझ हमीद सरकार स्थापना आणि तालिबानमधील अंतर्गत मतभेद मिटवण्यासाठी काबुलमध्ये आले आहेत. पाकिस्तान जाहीरपणे अफगाणिस्तानात हस्तक्षेप करत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

loading image
go to top