esakal | संतापजनक! नागपूरमध्ये रुग्णालयाच्या व्हरांड्यातच प्रसूती, बाळाचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

नागपूरमध्ये रुग्णालयाच्या व्हरांड्यातच प्रसूती, बाळाचा मृत्यू

नागपूरमध्ये रुग्णालयाच्या व्हरांड्यातच प्रसूती, बाळाचा मृत्यू

sakal_logo
By
नामदेव कुंभार

धक्कादायक! दोन रुग्णालयाने प्रवेश नाकारला तर एका रुग्णालयाने दोन तास टाळाटाळ केली.

उपराजधानी नागपूरध्ये संतापजनक आणि मन सुन्न करणारी घटना घडली आहे. गर्भवती महिलेला प्रसूती कळा होत असताना शहरातील दोन रुग्णालयाने दाखल करुन घेण्यास नकार दिल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. परिणामी रुग्णालयाच्या व्हरांड्यातच महिलेची प्रसूती झाली. यामध्ये बाळाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शहरातील डागा या सरकारी रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडलाय.

गर्भवती महिलेला रुग्णालयात दाखल करण्यास नकार दिल्यामुळे जन्मापूर्वीच चिमुकल्याची हत्या केल्याचा संताप सर्वसामान्य व्यक्त करत आहेत. 27 वर्षीय राणी वासणीक या महिलेला प्रसूती कळा व्हायला लागल्यानंतर कुटुंबियांनी रुग्णालयात धाव घेतली. मात्र, कन्हान प्रथमिक आरोग्य केंद्र आणि कामटी उपजिल्हा रुग्णालयाने दाखल करुन घेण्यास नकार दिला. येथून त्यांना नागपूर शहरातील डागा रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, इथं पोहचल्यानंतर रुग्णालयाने तब्बल दोन तास प्रवेश नाकारला.

हेही वाचा: भारतातल्या हिंदू-मुस्लिमांचे पूर्वज एकच - मोहन भागवत

राणी वासणीक यांना प्रसूती कळा जाणवत असतानाही दोन रुग्णालयाने प्रवेश नाकारला. तर एका रुग्णालयाने दोन तास प्रवेश देण्यास टाळाटाळ केली. परिणामी रुग्णालयाच्या व्हरांड्यातच प्रसूती झाली. यामध्ये चिमुकल्या बाळाचा मृत्यू झाला आहे. महिलेच्या कुटुंबियांनी रुग्णालयावर गंभीर आरोप केले आहेत. रुग्णालयाच्या व्हरांड्यातच प्रसूती झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या संतापजनक घटनेमुळे सरकारी रुग्णालयाच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

हेही वाचा: राणेंच्या वाहनावरील ड्रायव्हरचा मृत्यू; कुटुंबियांनी केले गंभीर आरोप

या प्रकरणावर अद्याप रुग्णालयाकडून कोणतेही स्पष्टीकरण आलेलं नाही. राणी वासणिक या मूळच्या नागपूरमधील वाडी येथील राहणाऱ्या आहेत. त्यांचं माहेर नागपूरमधील कन्हान येथील आहे. त्यामुळे गर्भवती असताना राणी वासणिक आपल्या आईकडे कन्हानमध्ये गेल्या होत्या. रविवारी राणी वासणिक यांना प्रसूती कला जाणवायला लागल्या. तेव्हा कुटुंबियांनी त्यांना कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलं. मात्र, तिथून त्यांना कामटी उपजिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आलं. पण येथेही त्यांना दाखल करुन घेतलं नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी नागपूरमधील डागा रुग्णालयात धाव घेतली. डागा रुग्णालयातही दाखल करण्यास दोन तास उशीर केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्येही हा धक्कादायक प्रकार दिसत आहे. रुग्णालयतील व्हरांड्यातच राणी वासणिक यांची प्रसूती झाली. दुर्देवाने असुरक्षित प्रसूतीमुळे बाळ दगावलं.

loading image
go to top