इराणच्या सर्वोच्च नेत्याचे ट्विटर अकाऊंट हिंदीमध्ये

सकाळ वृत्तसेवा
Monday, 10 August 2020

इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला सैय्यद अली खोमेनी यांनी हिंदी भाषेमध्ये आपलं अधिकृत ट्विटर अकाऊंट उघडलं आहे.

तेहरान- इराणचे (Iran) सर्वोच्च नेता अयातुल्ला सैय्यद अली खोमेनी (Ayatollah Sayyid Ali Khamenei) यांनी हिंदी भाषेमध्ये आपलं अधिकृत ट्विटर अकाऊंट उघडलं आहे. अकाऊंटवर देवनागरी लिपीमध्ये त्यांनी आपली माहिती लिहिली आहे. त्यांनी अकाऊंट काढल्यानंतर ट्विटही केलं आहे. 

ही बातमी लिहित असताना खोमेनी यांचे ट्विटरवर 3143 फॉलोवर्स होते.  आयातुल्ला खोमेनी यांनी आतापर्यंत दोन ट्विट केले आहेत. खोमेनी यांनी हिंदीसोबत फारसी, अरबी, उर्दु, फ्रेन्च, स्पॅनिश आणि इंग्रजी भाषेतही आपले ट्विटर अकाऊंट काढले आहे. खोमनी यांनी आपल्या हिंदी ट्विटर अकाऊंटवरुन अद्याप  कोणत्याही भारतीय नेत्याला फॉलो केलेले नाही. 

अयातुल्ला खोमेनी इराणचे दुसरे आणि सध्याचे सर्वोच्च नेते आहेत.  ते याआधी 1981 ते 1989 मध्ये इराणचे राष्ट्रपती होते. 1989 पासून आतापर्यंत अयातुल्ला खोमेनी मध्य पूर्वमधील सर्वाधिक काळ सत्तेत राहणारे राष्ट्र प्रमुख आहेत.

(edited by-kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: iran supreme leader created twitter in hindi account