युक्रेनचे विमान आम्हीच पाडले, पण ते....

वृत्तसंस्था
शनिवार, 11 जानेवारी 2020

तेहरान : इराणची राजधानी तेहरानच्या विमानतळाजवळ 8 जानेवारीला युक्रेनचे विमान कोसळले होते. हे विमान इराणच्या लष्करकडून चुकून पडल्याची कबूली इराणच्या लष्कराने दिली आहे. त्याच दिवशी पहाटे इराणने इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर मिसाईल हल्ला केला होता. यातील एक मिसाईल युक्रेनच्या विमानाला लागून 176 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

Video : इराणचा अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला; कासीम सुलेमानींच्या हत्येचा घेतला बदला

इराणचे कमांडर कासीम सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इराणने अमेरिकेच्या इराकमधील हवाई तळांवर मिसाईल हल्ले केले होते. 15 पेक्षा जास्त मिसाईलचा यावेळी इराणकडून वापर करण्यात आला होता. यातील एक मिसाईल चुकून युक्रेन एअरलाईन्सच्या विमानाला लागून ते खाली कोसळले व जागीच सर्वांचा मृत्यू झाला. तेहरान विमानतळावरून या विमानाचे उड्डाण झाले होते. उड्डाणाच्या काही मिनिटांतच हे विमान कोसळले होते. पण त्यावेळी ते तांत्रिक कारणांमुळे कोसळल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आज इराण लष्कराकडून हे विमान चुकून पडले. हे विमान पाडण्याचा कोणताही हेतू नव्हता. केवळ मानवी चुकीमुळे ही घटना घडल्याचे इराण लष्कराने सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या विमान दुर्घटनेत 176 प्रवासी व विमानातील क्र्यू मेंबर्सचा मृत्यू झाला होता. 82 इराणी, 63 कॅनडा, 11 युक्रेनियन प्रवासी या विमानात होते. विमानातील ब्लॅक बॉक्स सापडल्यानंतर तो युक्रेनकडे देण्यास इराणने नकार दिला होता. त्याचवेळी या प्रकरणावर संशय व्यक्त केला जात होता.

'अण्वस्त्रे तयार केली तर बघाच!'; ट्रम्प इराणवर भडकले

इराणचा इराकमधील अमेरिकी तळांवर हल्ला
इराणच्या सैन्याकडून आज 8 जानेवारीला पहाटे साडेपाचच्या दरम्यान इराकमधील अमेरिकेच्या दोन लष्करी तळांवर हल्ले करण्यात आले होते. तब्बल डझनभरहून जास्त बॅलेस्टीक मिसाईलने अमेरिकेच्या तळांवर हल्ला करण्यात आला असल्याची माहिती अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय पेंटागॉनकडून स्पष्ट करण्यात आली होती. इराणचे कमांडर कासीम सुलेमानी यांच्या हत्येचा बदला म्हणून इराणने हा हल्ला केल्याचे इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीने सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Iran unintentionally shot down Ukrainian jetliner because of human error