
Iran Vs USA : इराण-इस्रायल युद्धानं आता दिवसेंदिवस आक्रमक स्वरुप धारण करायला सुरुवात केली आहे. अमेरिकेनं इराणच्या आण्विक स्थळांवर हल्ला केल्यानंतर आता इराणनं त्याला प्रत्युत्तरादाखल कतारनंतर इराक आणि सीरियातील अमेरिकनं सैन्य ठिकाणांवर क्षेपणास्त्र डागली आहेत. इराणच्या सरकारी टीव्हीवरुन या हल्ल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.