इसिसविरुद्ध जोरदार हल्ले

रॉयटर्स
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

बगदाद - इसिसच्या ताब्यात असलेले मोसूलच्या मुक्तीसाठी इराकचे दहशतवादविरोधी दलाने जोरदार अभियान सुरू केले आहे.

हेलिकॉप्टरमधून दहशतवाद्यांवर गोळीबार केला जात आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आघाडी सैन्यांसमवेत इराकचे दहशतवादविरोधी पथक हवाई हल्ले करत आहे.

इराकचे सर्वांत मोठे दुसरे शहर ताब्यात घेण्यासाठी सुरू असलेल्या युद्धाचा आज चौथा दिवस होता. मेजर जनरल मान अल सादी यांनी म्हटले, की ईश्‍वराची इच्छा असेल तर आज शहरावर ताबा मिळवू. दहशतवादविरोधी विरोधी विशेष दलाने आघाडी घेतली आहे. मोसूलमध्ये मोठा प्रतिकार होण्याची शक्‍यता गृहीत धरली असून, इसिसचे दहशतवादी भीषण संघर्षाची तयारी करत असल्याचे सादी यांनी म्हटले आहे.

Web Title: iraq attacks against Isis