इस्त्रायलची सुरक्षा करतंय अदृश्य कवच; कसं?

israel iron dome
israel iron domefile photo

इस्त्रायल आणि हमासमध्ये संघर्ष सुरुय. पॅलेस्टाईनची कट्टर दहशतवादी संघटना हमास १० मेपासून इस्त्रायलवर रॉकेट हल्ला करतेय. प्रत्युत्तरात इस्त्रायल पॅलेस्टिनी भागांवर बॉम्बवर्षाव करतंय. त्यांच्या या संघर्षासंबंधी अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताहेत. त्यातील एक व्हिडिओ आहे इस्त्रायल डिफेन्स फोर्सचा. यात इस्त्रायलच्या अवकाशात रॉकेटचा वर्षाव होताना दिसतोय, पण आकाशातच हे रॉकेट नष्ट होताहेत. ही सगळी कमाल आहे आयर्न डोमची. हे शस्त्र इस्त्रायलासाठी एखाद्या कवच्याप्रमाणे काम करतंय. आकाशातून येणाऱ्या संकटाचा खात्मा करण्यासाठी या शस्त्राची निर्मिती करण्यात आली होती. तर नेमकं काय आहे हे आयर्न डोम आणि ते कशापद्धतीने काम करतं हे आपण पाहूया...(Iron Dome system The invisible shield protecting Israel from Hamas rockets Palestine)

२००१ मध्ये पहिल्यांदा हमासने गाझा पट्टीमधून इस्त्रायलवर रॉकेट सोडले होतं. सुरुवातीला या रॉकेटची रेंज छोटी होती, पण २०१२ पर्यंत हे रॉकेट इस्त्राईलची राजधानी तेल अवीवपर्यंत पोहोचलं होतं. हमासने हळूहळू आपली ताकद वाढवली होती, यासाठी इराणने त्याला सर्वप्रकारची मदत केली. याकाळात इस्त्रायल शांत बसला होता का, तर असं नाही. आकाशातून येणाऱ्या संकटाचा सामना करण्यासाठी इस्त्रायलने एक सुरक्षा कवच बनवण्यास सुरुवात केली. सुरक्षा कवच याचा अर्थ अँटी मिसाईल सिस्टिम. याचं काम आहे शत्रूचं रॉकेट लक्ष्यापर्यंत पोहोचण्याआधीच त्याला नष्ट करणं. ही ऐकायला सोपी गोष्ट वाटत असली, तर रॉकेटला हवेतल्या हवेत नष्ट करणं अत्यंत अवघड काम आहे.

इस्त्रायलच्या कंपनीने बनवलं शस्त्र

राफेल अॅडवान्स डिफेन्स सिस्टिम कंपनीने या प्रोजेक्टवर काम करण्यास सुरुवात केली. अमेरिकेने यासाठी इस्त्रायला मोठी आर्थिक मदत केली. सर्वांच्या प्रयत्नामुळे इस्त्रायलनं असं एक उपकरण तयार केलं होतं, जे आकाशातच शत्रूच्या रॉकेटला नष्ट करु शकत होतं. इस्त्रायच्या भात्यात आता असं शस्त्र जमा झालं होतं, जे देशाला एकप्रकारचं सुरक्षा कवच पुरवणार होते. हे एक असं कवच आहे, ते भल्याभल्यांना भेदनं शक्य नाही. इस्त्रायलच्या या डिफेन्स सिस्टिमचं नावं होतं आयर्न डोम. आयर्न डोमची अॅक्युरिसी आहे ८० ते ८५ टक्के. याच्या नजरेतून सुटून रॉकेट इस्त्रायलच्या हद्दीत घुसणं खूप अवघड आहे. आयर्न डोमनं इस्त्रायल आणि हमासमधील युद्धाची समीकरणं संपूर्ण बदलली होती.

israel iron dome
इस्रायलचा गाझामध्ये मोठा स्ट्राइक, हमासचा मुख्य कमांडर ठार

आयर्न डोम नेमकं कसं काम करतं?

आयर्न डोमच्या एका युनिटला बॅटरी म्हटलं जातं आणि या बॅटरीचे तीन वेगवेगळे भाग असतात. रडार, कंट्रोल सेंटर आणि लॉन्चर. जेव्हा गाझापट्टीमधून इस्त्रायलवर रॉकेट डागलं जातं, तेव्हा रडारला याची माहिती मिळते. रडार रॉकेटची स्पिड आणि ते कोणत्या दिशेने येत आहे याचा पता लावतं. ही माहिती रडार लगेच कंट्रोल सेंटरला पाठवते. या सेंटरमध्ये हायस्पिड कॉम्प्युटर असतात. याच्या मदतीने रॉकेड कुठे पडेल हे कळतं. रॉकेट जर लोक असलेल्या ठिकाणी किंवा कोणत्या महत्वाच्या इमारतीवर पडणार असणार असेल तर ही सूचना पुढे लॉन्चरला दिली जाते. पण, रॉकेट मोकळ्या जागी पडणार असेल, तर ते पडू दिलं जातं. लॉन्चरचं काम महत्त्वाचं असतं. कंट्रोल सेंटरकडून सूचना मिळताच लॉन्चरमधून इंटरसेप्टर सोडलं जातं, जे शत्रूकडून येणाऱ्या रॉकेटला आकाशातच नष्ट करतं. रडार, कंट्रोल सेंटर आणि लॉन्चर तिन्हींना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले जातं आणि त्यांना एका ठिकाणाहून दुसरीकडे सहजपणे नेलं जाऊ शकतं. एक इंटरसेप्टर लॉन्च करण्यासाठी जवळपास ७५ लाख रुपयांचा खर्च येतो.

सध्या हमासकडून इस्त्रायलवर रॉकेटचा वर्षाव होत आहे. यातील बरेचशे रॉकेट आयर्न डोमने हवेतच नष्ट केले, पण काही रॉकेटनी लोकांचा जीव घेतला आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सध्याची परिस्थिती गंभीर स्पोटक आहे. गेल्या सात वर्षानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात हिंसा होत आहे. दोन्ही पक्षांकडील लोकांचा मृत्यू होतोय. दोघेही एकमेंकाना जास्तीत जास्त नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करताहेत. हा संघर्ष संपायचाय तेव्हा संपेल, पण यामध्ये सर्वसामान्यांचा जीव जातोय हे वास्तव आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com