इस्रायलचा गाझामध्ये मोठा स्ट्राइक, हमासचा मुख्य कमांडर ठार

अनेक मोठ्या इमारती कोसळल्या आहेत.
इस्रायलचा गाझामध्ये मोठा स्ट्राइक, हमासचा मुख्य कमांडर ठार

जेरुसलेम: गाझा पट्टीत सुरु असलेला संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. इस्रायलची (Israel strikes) हमास (Hamas)विरोधात आक्रमक कारवाई सुरुच आहे. इस्रायलने केलेल्या हल्ल्यात (Israel strikes) हमासचे दहा वरिष्ठ लष्करी अधिकारी ठार झाले आहेत. इस्रायलने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये (Air strike) हमासचे दोन टॉवर उद्धवस्त झाले आहेत. इस्रायलने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये मध्य गाझातील अनेक मोठ्या इमारती कोसळल्या आहेत. या संघर्षात ४८ पॅलेस्टाइन्सचा मृत्यू झाला आहे. यात १४ लहान मुले आणि तीन महिला आहेत. (Israel strikes kill senior Hamas commander, Palestinians fire rockets)

आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. यात ८६ लहान मुले आणि ३९ महिला आहेत. गाझामध्ये ज्या इमारती पाडण्यात आल्या, त्याचे इस्रायली टीव्ही वाहिन्यांवर प्रक्षेपण करण्यात आले. इस्रायलने केलेल्या या स्ट्राइकला प्रत्युत्तर म्हणून हमासने इस्रायलच्या दिशेने १३० रॉकेटल डागलेत, असे वृत्त AFP ने दिले आहे.

इस्रायलचा गाझामध्ये मोठा स्ट्राइक, हमासचा मुख्य कमांडर ठार
लॉकडाउनमध्ये दुकानदारांचे ५० हजार कोटींचे नुकसान

गाझा आणि खान युनिसमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये हमासचे अनेक वरिष्ठ लष्करी कमांडर्स ठार झाल्याचे इस्रायली लष्कराने म्हटले आहे. "ज्यांना लक्ष्य करण्यात आलं, तो हमासच्या जनरल स्टाफचा महत्त्वाचा भाग होता.

इस्रायलचा गाझामध्ये मोठा स्ट्राइक, हमासचा मुख्य कमांडर ठार
विरारमधल्या गायब झालेल्या आजोबांचं अखेर गूढ उकललं...

पहिल्यांदाच अशा पद्धतीचे ऑपरेशन करण्यात आले" असे लष्कराने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. गाझामध्ये बुधवारी इस्रायलने मोठा हल्ला केला. हमास आणि अन्य पॅलेस्टाइन दहशतवाद्यांनी प्रत्युत्तर म्हणून तेल अवीव आणि बीरशीबामध्ये रॉकेट हल्ले केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com