
देव आहे की नाही यावरून वैज्ञानिकांसह सर्वसामान्यांमध्येही वादविवाद होतात. आता खगोलशास्त्रज्ञ आणि एअरोस्पेस इंजिनिअर असलेल्या डॉक्टर विली सून यांनी मोठा दावा केलाय. त्यांनी हार्वर्ड आणि स्मिथसोनियन सेंटर फॉर एस्ट्रोफिजिक्समध्ये बराच काळ काम केलंय. विली सून यांनी एक गणितीय सूत्र देवाच्या अस्तित्वाचं अंतिम प्रमाण असू शकतं असं म्हटलंय. टकर कार्लसन नेटवर्कमध्ये बोलताना त्यांनी हे सूत्रही सादर केलं. देव असल्याचा हा महत्त्वाचा पुरावा आहे आणि फाइन ट्युनिंग तर्क असून सोप्या भाषेत सांगायचं तर ब्रह्मांडाचे भौतिक नियम लाइफ सपोर्टसाठी पूर्णत: संतुलित आहेत, काहीच योगायोगाने असू शकत नाही असंही विली सून यांनी म्हटलंय.