
सिरियात गुरुवारी झालेल्या हिंसाचारात १ हजार पेक्षा जास्त लोक मारले गेले आहेत. सुरक्षा दल आणि माजी राष्ट्रपती बशल अल असद यांच्या समर्थकांमध्ये संघर्षावेळी हा हिंसाचार झाला. असोसिएटेड प्रेसने याबाबत माहिती दिलीय. सध्याच्या सरकारच्या समर्थकांनी माजी राष्ट्रपतींच्या समर्थकांवर गोळीबार करत बदल्याच्या भावनेतून हत्येला सुरुवात केल्यानंतर हा हिंसाचार झाला. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी मोठ्या प्रमाणावर हत्या झाल्या आहेत.