Ishan Tharoor : काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या मुलाला वॉशिंग्टन पोस्टने नोकरीवरुन काढले; ईशान यांनी भावनिक पोस्टद्वारे सांगितले सत्य

Shashi Tharoor son : काँग्रेस खासदार शशी थरूर यांचा मुलगा ईशान थरूर यांना The Washington Post मधून नोकरीवरून काढण्यात आले. ईशान थरूर यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत या निर्णयाची माहिती दिली.
Ishan Tharoor

Shashi Tharoor son

esakal

Updated on

Ishan Tharoor Layoff: काँग्रेस खासदार शशी थरूर यांचा मुलगा ईशान थरूर यांना अमेरिकेतील नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. थरूर यांनी स्वतः या वृत्ताला दुजोरा दिला. त्यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत त्यांचे तीव्र दुःख व्यक्त केले. द वॉशिंग्टन पोस्टने काढून टाकलेल्या पत्रकारांमध्ये त्यांचाही समावेश आहे. वृत्तपत्राने मोठ्या प्रमाणात कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे त्यांच्या आंतरराष्ट्रीय कव्हरेज आणि क्रीडा डेस्कवर परिणाम झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com