ISI Use and Throw : दाऊद-हाफीजचं टेन्शन वाढलं; पाकिस्तान स्वतःच करतंय अतिरेक्यांचा खात्मा

आयएसआयची यूज-अँड-थ्रो पॉलिसी या हत्यांना कारणीभूत असल्याचं म्हटलं जातंय.
ISI Use and Throw
ISI Use and ThrowEsakal

दहशतवाद्यांना शरण देण्यासाठी कुप्रसिद्ध असलेला पाकिस्तान आता कदाचित आपली प्रतिमा बदलण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तान सरकार हळू-हळू अतिरेक्यांना संपवत असल्याची माहिती मीडिया रिपोर्टमधून समोर आली आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI च्या टार्गेटवर आता दाऊद इब्राहिम आणि हाफीज सईद असे दहशतवादी असल्याचं म्हटलं जातंय.

आज तक या वृत्तसंस्थेने याबाबत रिपोर्ट जारी केला आहे. पाकिस्तान सरकारला ज्या दहशतवाद्यांची गरज नाही, अशांचा खात्मा करण्याचं काम सुरू असल्याचं यात म्हटलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून आयएसआयने पाकिस्तानातील बरेच अतिरेकी संपवले आहेत. त्यामुळे आता पाकिस्तानही दहशतवाद्यांसाठी सुरक्षित नसल्याचं स्पष्ट होतंय.

ISI Use and Throw
Morgan Stanley report : "2013 पेक्षा आजचा भारत वेगळा"; मॉर्गन स्टेनलीच्या अहवालातून कौतुकाचा वर्षाव

२६/११ चे दहशतवादी

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या ३ महिन्यांमध्ये अशा ४ दहशतवाद्यांना ठार करण्यात आलंय, ज्यांचा २६/११ हल्ल्याच्या कटात सहभाग होता. यामध्ये हिजबुल या दहशतवादी संघटनेतील अतिरेकी आणि खलिस्तानी अतिरेक्यांचा समावेश आहे.

ISI करतंय सफाया

गेल्या काही महिन्यांमध्ये पाकिस्तानात कित्येक दहशतवाद्यांचा मृत्यू झाला आहे. यातील काहींचा स्पष्टपणे खून झाला आहे, तर काहींचा संशयास्पद मृत्यू झालाय. ६ मे रोजी खलिस्तानी कमांडो फोर्सच्या परमजीत सिंहची लाहोरमध्ये हत्या केली गेली. तर, त्यापूर्वी २० फेब्रुवारीला हिजबुल दहशतवादी बशीर अहमद पीरचा खून झाला होता. या हत्या पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेने केल्या असल्याचं म्हटलं जातंय.

ISI Use and Throw
Terrorist Abdul Salam Bhuttavi : दहशतवादी अब्दुल सलाम भुट्टावी याचा पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील तुरुंगात मृत्यू

यूज अँड थ्रो

आयएसआयची यूज-अँड-थ्रो पॉलिसी या हत्यांना कारणीभूत असल्याचं म्हटलं जातंय. जे अतिरेकी त्यांच्या कामी येत नाहीत, किंवा ज्यांची गरज संपली आहे अशा सर्वांचा ISI खात्मा करत असल्याचा संशय आहे. २९ मे रोजी जमात-उद-दावा या संघटनेचा प्रमुख हाफिज अब्दुल सलाम याचा तुरुंगात संशयास्पद मृत्यू झाला. हा लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी होता, तसंच हाफीज सईदचा विश्वासू व्यक्ती होता.

दाऊद-हाफीजचं टेन्शन वाढलं

पाकिस्तान सरकारच्या या पवित्र्यामुळे आता दाऊद इब्राहिम आणि हाफीज सईद यांचे धाबे दणाणले आहेत. आयएसआय आपल्यालाही यूज-अँड-थ्रो पॉलिसीच्या अंतर्गत संपवून टाकेल अशी भीती त्यांना वाटत आहे. त्यामुळेच, हे दोघे आपल्या बिळात लपून बसले आहेत, असा अंदाज वर्तवण्यात येतोय.

ISI Use and Throw
Dawood Ibrahim : दुसरं लग्न करुन दाऊद...; हसीना पारकरच्या मुलाने उलगडलं मुंबई कनेक्शन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com