'इसिस'च्या संशयित दहशतवाद्यास कुवेतमध्ये अटक

वृत्तसंस्था
शनिवार, 6 ऑगस्ट 2016

नवी दिल्ली : कट्टर दहशतवादी संघटना ‘इसिस‘च्या भारतातील ‘समर्थकांना‘ आर्थिक मदत केल्याच्या आरोपावरून कुवेतमधील पोलिसांनी एका संशयितास अटक केली. भारतातील राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने (एनआयए) दिलेल्या माहितीनंतर कुवेतने ही कारवाई केली. अब्दुल्ला हैदी अब्दुल रेहमान असे त्या संशयिताचे नाव आहे. 

कल्याणमधील चार युवकांना पश्‍चिम आशियामध्ये जाण्यासाठी अब्दुल रेहमानने आर्थिक मदत केल्याचा सुरक्षा यंत्रणांना संशय आहे. 2014 च्या मे महिन्यात कल्याण येथील चार युवक पश्‍चिम आशियामध्ये गेले होते. येथून ते बेपत्ता झाले होते आणि ते ‘इसिस‘मध्ये दाखल झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. 2014 च्या नोव्हेंबरमध्ये त्यातील एकाला अटक करून पुन्हा मुंबईत आणण्यात आले होते. 

गेल्या महिन्यात ‘इसिस‘ने रचलेले तीन कट कुवेतच्या सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावले होते. यानंतर सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या कारवाईमध्ये अनेक दहशतवाद्यांना अटक झाली होती.

Web Title: ISIS sympathizer arrested in Kuwait