पाकमध्ये मंत्रिमंडळ जाहीर करण्यास विलंब

सर्वच घटक पक्षांना संधी देत आघाडी टिकविण्याचा प्रयत्न
Islamabad Delay in announcing cabinet in Pakistan new Prime Minister Shehbaz Sharif
Islamabad Delay in announcing cabinet in Pakistan new Prime Minister Shehbaz SharifE Sakal

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांना पंतप्रधानपदावरून हटविण्यासाठी एकत्र आलेल्या पक्षांनी आता सरकार स्थापन केले असले तरी या आघाडीची स्थिती फारशी मजबूत नाही. त्यामुळेच नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे इतक्यात मंत्रिमंडळ जाहीर करण्याची शक्यता नसल्याचे येथील माध्यमांनी म्हटले आहे. वाद टाळण्यासाठी सर्वच पक्षांना प्रतिनिधीत्व देण्याचा शरीफ यांचा विचार असून त्याबाबत सविस्तर चर्चा सुरु असल्याचे समजते.

सध्याच्या आघाडीत शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज गट) आणि झरदारी-भुट्टो यांची पाकिस्तान पीपल्स पार्टी या दोन प्रमुख पक्षांसह सहा लहान पक्ष आणि चार अपक्ष सहभागी आहेत. या आघाडीकडे नॅशनल असेंब्लीमध्ये केवळ दोन मतांची आघाडी आहे. त्यामुळे कोणालाही, अगदी अपक्षांनाही नाराज न करता सर्वच पक्षांना योग्य प्रमाणात प्रतिनिधीत्व देण्यास दोन्ही मोठ्या पक्षांच्या नेत्यांची तयारी आहे. विशेषत:, इम्रान सरकारविरोधात विरोधकांनी आघाडी उभारल्यानंतर त्यांच्या पाकिस्तान तेहरीके इन्साफ पक्षातून बाहेर पडणाऱ्या नेत्यांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.

नवाज यांच्या पासपोर्टचे नूतनीकरण

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि माजी अर्थमंत्री इशक दार यांच्या पासपोर्टचे नूतनीकरण करण्याचे आदेश येथील नव्या सरकारने दिले आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली शिक्षा झालेले नवाज हे फरार घोषित असून सध्या ते लंडनमध्ये रहात आहेत. इम्रान खान सरकारने नवाज यांच्या पासपोर्टचे नूतनीकरण करण्यास नकार दिला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com