कोरोनाविरोधात 'चमत्कारिक लस' तयार केल्याचा इस्त्राईलचा दावा

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 7 August 2020

जगभरात कोरोना विषाणूविरोधात प्रभावी लस तयार करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. अशात इस्त्राईलमधून एक महत्वाची बातमी आली आहे.

तेल अवीव- जगभरात कोरोना विषाणूविरोधात प्रभावी लस तयार करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. अशात इस्त्राईलमधून एक महत्वाची बातमी आली आहे. इस्त्राईलने कोरोना विषाणूविरोधात चमत्कारिक परिणाम दाखवणारी लस तयार केल्याचा दावा गुरुवारी केला आहे. या लसीची मानवी चाचणी अजून सुरु झालेली नाही, मात्र लवकरच याची परवानगी देण्यात येणार असल्याचं इस्त्राईलने सांगितलं आहे. 'नवभारत टाईम्स'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. 

जगातील पहिल्या कोरोना लसीची 12 ऑगस्ट रोजी नोंदणी!

इस्त्राईलचे संरक्षणमंत्री बेनी गांट्ज यांनी इस्त्राईल इन्स्टिट्यूट ऑफ बॉयोलॉजिकल रिसर्चचा दौरा केला. त्यांनंतर त्यांनी ही माहिती दिली आहे. इस्त्राईलच्या संरक्षण आणि प्रधानमंत्री कार्यालयाने एक वक्तव्य जाहीर केलं आहे. एक खूप चांगली लस बनवण्यात आली आहे आणि मानवांवर याच्या चाचणीची प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येईल, असं सांगण्यात आलं आहे. इन्स्टिट्यूटचे संचालक शैमुअल शपिरा यासंदर्भात माहिती देताना म्हणाले की, आम्हाला आपच्या लसीबद्दल अभिमान आहे. महिन्यानंतर या लसीची मानवी चाचणी सुरु करण्यात येईल.

इस्त्राईलने लस प्रभावी असल्याचा दावा केला असला तरी याचा वापर केव्हा करण्यात येईल हे सांगण्यात आलं नाही. याआधी मे महिन्यात इस्त्राईलचे मंत्री नफताली बेन्नेट यांनी डिफेंस बायोलॉजिकल इन्स्टिट्यूटने कोरोनावर लस निर्माण केल्याचं म्हटलं होतं. इन्स्टिट्यूटने कोरोना विषाणू विरोधात लढण्यासाठी अँटिबॉडी तयार करण्यात मोठं यश मिळवलं असल्याचंही ते म्हणाले होते. 

कोरोनामुक्त झालेल्या 90 टक्के रुग्णांमध्ये फुफ्फुसाचा आजार

कोरोना विषाणू लसीच्या विकासाचे कार्य पूर्ण झाले आहे. संशोधक आता यासाठी पेटेंट आणि व्यापक प्रमाणात उत्पादन करण्यासाठी तयारी करत आहेत. इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू कार्यालयाच्या अंतर्गत चालणाऱ्या गोपनीय इस्त्राईल इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल रिसर्चचा दौरा केल्यानंतर बेन्नेटनी ही घोषणा केली होती. बेन्नेट यांच्या म्हणण्यानुसार, अँटिबॉडी मोनोक्लोनल पद्धतीने कोरोना विषाणूवर हल्ला करतात आणि रुग्णांच्या शरीरात विषाणूला नष्ट करतात. 

दरम्यान, सध्या 142 पेक्षा अधिक उमेदवार कोरोनावरील प्रभावी लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. यातील अनेक उमेदवारांनी कोरोना लसीचा तिसरा टप्पा गाठला असल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे रशियाने कोरोना लसीच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्याचा दावा केला आहे. शिवाय ऑक्टोंबरपासून मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरु करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे कोरोना लसी निर्मितीच्या प्रक्रियेला वेग आल्याचं दिसत आहे. 

(edited by-kartik pujari)

भारत भारत भारत india india


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Israel, claims excellent corona virus vaccine