

Netanyahu Offers Rotational Prime Ministership to Gadi Eisenkot
esakal
Jerusalem: इस्रायलमधील सत्तास्थापनेचा पेच सोडवण्यासाठी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी नवा राजकीय फॉर्म्युला पुढे केल्याचे वृत्त आहे. विरोधी पक्षनेते गाडी आयझेनकोट यांना आधी पंतप्रधानपद देऊन त्यानंतर स्वतः दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान होण्याचा प्रस्ताव नेतान्याहू यांनी मांडल्याचे इस्रायली माध्यमांनी म्हटले आहे. नेतान्याहू यांच्या हा प्रस्तावावर आयझेनकोट यांनी अद्याप आपले पत्ते उघडलेले नाहीत.