जेरुसलेम : गाझा पट्टीतील सर्वात मोठे शहर गाझा सिटी इस्रायली सैन्याच्या (Israel Hamas Clash) लक्ष्यावर असून तिथे सतत हवाई हल्ले व जमिनीवरील कारवाया सुरू आहेत. गुरुवारी रात्री झालेल्या बॉम्बहल्ल्यात १६ पॅलेस्टिनी ठार झाले, तर डझनभर नागरिक जखमी झाले. आतापर्यंतच्या कारवाईत एकूण ७१ पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे.