Israel-Hamas Ceasefire Broken: ‘’गाझावर पूर्ण ताकदीने हल्ला करा...’’ ; नेतान्याहू यांनी लष्कराला दिले आदेश!

Netanyahu Orders Full Military Strike on Gaza : इस्रायल-हमासने युद्धबंदी करार मोडला ; आता पुन्हा एकदा संघर्ष उफाळणार
Prime Minister Netanyahu commands military to respond with full force.

Prime Minister Netanyahu commands military to respond with full force.

esakal

Updated on

Israel Hamas conflict : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मंगळवारी गाझा पट्टीवर तत्काळ "शक्तिशाली हल्ला" करण्याचे आदेश दिले आहेत. पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासवर युद्धबंदीचे उल्लंघन केल्याचा आरोप केल्यानंतर इस्रायलकडून हा निर्णय घेण्यात आला. इस्रायली सैन्याने दक्षिण गाझामध्ये हमासने गोळीबार केल्याचे वृत्त दिल्यानंतर लगेचच पंतप्रधान नेतन्याहू यांनी ही घोषणा केली आहे.

नेतन्याहू यांच्या कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सुरक्षेबाबत सल्लामसलत केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आणि पंतप्रधानांनी सैन्याला गाझामधील लक्ष्यांवर त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, निवेदनात म्हटले आहे की, "सुरक्षाविषयक सल्लामसलत केल्यानंतर, पंतप्रधान नेतन्याहू यांनी लष्कराला गाझा पट्टीत तत्काळ, शक्तिशाली हल्ले करण्याचे निर्देश दिले आहेत."

हमास या दहशतवादी गटाने एका ओलिसाचे मृतदेहाचे अवशेष परत केल्यानंतर तणाव वाढला होता. इस्रायलचे म्हणणे आहे की हे अवशेष जवळजवळ दोन वर्षांपूर्वी सापडलेल्या ओलिसाचे आहेत. इस्रायलच्या फॉरेन्सिक तपासणीतून असे दिसून आले की सोमवारी रात्री उशीरा हमासने परत केलेले अवशेष प्रत्यक्षात एका ओलिसाचे होते ज्याचा मृतदेह आधीच इस्रायलला सुपूर्द करण्यात आला होता. तर पंतप्रधान नेतन्याहू यांच्या कार्यालयाने याला "कराराचे स्पष्ट उल्लंघन" असे म्हटले आहे. युद्धबंदी अंतर्गत, हमासला २८ ओलिसांचे मृतदेह इस्रायलला सोपवणे आवश्यक होते.

Prime Minister Netanyahu commands military to respond with full force.
Prashant Kishor Notice : बिहार निवडणुकीआधी प्रशांत किशोर यांना धक्का! ; निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस

अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर हमास आणि इस्रायल युद्धबंदीवर सहमत झाले होते. पण आता पुन्हा एकदा तणाव वाढण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच, इस्रायलने दक्षिण गाझामध्ये हमासने त्यांच्या सैन्यावर गोळीबार केल्याचे वृत्त दिले आहे.

दुसरीकडे, हमासने म्हटले आहे की इस्रायलकडून युद्धबंदी कराराच्या कराराच्या उल्लंघनांमुळे त्यांनी ओलिसाचा मृतदेह परत करण्याची योजना पुढे ढकलली आहे. हमासच्या लष्करी शाखेने जाहीर केले आहे की ते एका ओलिसाचा मृतदेह परत करण्याची योजना पुढे ढकलत आहेत.

Prime Minister Netanyahu commands military to respond with full force.
8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आठव्या वेतन आयोगाला मोदी सरकारची मंजुरी

खरंतर हमासने मंगळवारी रात्री ८ वाजता ओलिसाचा मृतदेह परत करण्याची घोषणा केली होती. मात्र आता हमासने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे, की कब्जा करणाऱ्या देशाने केलेल्या युद्धबंदी कराराच्या उल्लंघनाच्या प्रत्युत्तरात हे पाऊल उचलण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com