Gaza Hospital Attack : 'देवा! हे तर आपलंच मिसाईल आहे...'; हमासच्या जिहादींमधील संवाद इस्राइलकडून व्हायरल

मागील काही दिवसांपासून इस्त्राइल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे.
israel hamas war Gaza Hospital Attack Israel shares Hamas operatives conversation about  misfired rocket
israel hamas war Gaza Hospital Attack Israel shares Hamas operatives conversation about misfired rocket
Updated on

इस्त्राइल आणि हमास यांच्यात मागील काही दिवसांपासून युद्ध सुरू आहे. यादरम्यान गाझा पट्टीतील एका रुग्णालयावर रॉकेट हल्ला झाल्याची घटना समोर आली होती. ही एअर स्ट्राइक इस्त्राइली सैन्याने केली असल्याचा आरोप हमासकडून केला जात आहे. मात्र इस्त्राइलने हा आरोप फेटाळून लावला आहे. तसेच हे रॉकेट इस्लामिक जिहाद यांच्या चुकीमुळे रुग्णालयावर पडल्याचे इस्त्राइलने म्हटले आहे.

या आरोप प्रत्यारोपांदरम्यान नेमकं हा हल्ला कोणी केला असा प्रश्न उपस्थित होत आहे. यादरम्यान दोन हमास ऑपरेटीव्ह मधील फोन संभाषण इस्त्राइल डिफेंन्स फोर्स (आयडीएफ)ने शेअर केलं आहे.

israel hamas war Gaza Hospital Attack Israel shares Hamas operatives conversation about  misfired rocket
Israel Hamas War : गाझा रुग्णालयावरील हल्ल्यात ५०० ठार! नेतान्याहू म्हणाले, इस्रायल नव्हे त्यांचंच रॉकेट...

गाझा शहरातील अल-अहली बॅप्टिस्ट हॉस्पिटलवर मंगळवारी रात्री रॉकेट हल्ला झाला होता. त्यानंतर इस्राइल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) द्वारे शेअर करण्यात आलेल्या दोन हमास कार्यकर्त्यांमधील फोन संभाषणात या घटनेबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या घटनेनंतर सुरुवातीला या हल्ल्यासाठी इस्राइल जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला . मात्र इस्राइल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) ने याबद्दलचे आरोप फेटाळून लावले. तसेच गाझा येथील दहशतवाद्यांनी, विशेषत: इस्लामिक जिहादने मिसफायर केलेल्या रॉकेटने हा स्फोट घडवून आणल्याचा खुलासा देखील त्यांनी केला.

israel hamas war Gaza Hospital Attack Israel shares Hamas operatives conversation about  misfired rocket
Israel Hamas War : इस्रायलची ताकद वाढणार! जो बायडन यांच्यानंतर आता ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनकही जाणार इस्त्राइल दौऱ्यावर

हमासच्या दोन ऑपरेटिव्हमधील संभाषणाचे रेकॉर्डिंग

हमास ऑपरेटिव्ह 1: मी तुम्हाला सांगतोय की अशा पद्धतीने क्षेपणास्त्र फेल होताना पहिल्यांदाच दिसतेय

हमास ऑपरेटिव्ह 2: आणि म्हणूनच ते पॅलेस्टिनी इस्लामिक जिहादचे असल्याचे सांगत आहेत.

हमास ऑपरेटिव्ह 1: काय?

हमास ऑपरेटिव्ह 2: ते म्हणतात की हे पॅलेस्टिनी इस्लामिक जिहादचे आहे.

हमास ऑपरेटिव्ह 1: हे आपलंच आहे?

हमास ऑपरेटिव्ह 2: तसंच वाटतंय.

हमास ऑपरेटिव्ह 1: हे कोण म्हणतो?

हमास ऑपरेटिव्ह 2: ते म्हणत आहेत की क्षेपणास्त्राचा शार्पनल लोकल शार्पनल आहे आणि इस्त्रायली शार्पनेलसारखा नाहीये.

हमास ऑपरेटिव्ह 1: तुम्ही काय म्हणताय (नाव)?

हमास ऑपरेटिव्ह 2: पण, देव त्यांचं रक्षण करो, स्फोटासाठी दुसरी जागा सापडली नसती?

हमास ऑपरेटिव्ह 1: काही हरकत नाही, होय, (नाव) त्यांनी हॉस्पिटलच्या मागे असलेल्या स्मशानभूमीतून ते सोडलं.

हमास ऑपरेटिव्ह 2: काय?

हमास ऑपरेटिव्ह 1: त्यांनी अल-मामदानी हॉस्पिटलच्या मागे असलेल्या स्मशानभूमीतून रॉकेट सोडलं पण ते मिसफायर झालं आणि चुकून त्यांच्यावर पडलं.

हमास ऑपरेटिव्ह 2: त्याच्या मागे स्मशानभूमी आहे?

हमास ऑपरेटिव्ह 1: होय, अल-मामदानी अगदी कंपाऊंडमध्येच आहे.

हमास ऑपरेटिव्ह 2: तुम्ही कंपाऊंडमध्ये गेल्यास ते कुठे आहे?

हमास ऑपरेटिव्ह 1: तुम्ही प्रथम कंपाऊंडमध्ये प्रवेश करा आणि शहराच्या विरूद्ध दिशेने गेलात की ते अल-मामदानी हॉस्पिटलच्या उजव्या बाजूला येते.

हमास ऑपरेटिव्ह 2: होय, मला ते माहित आहे.

israel hamas war Gaza Hospital Attack Israel shares Hamas operatives conversation about  misfired rocket
Israel Hamas War : गाझा रुग्णालयावरील हल्ल्यानंतर जो बायडन यांनी व्यक्त केला शोक; अरब नेत्यांसोबतची शिखर बैठकही केली रद्द

गाझा रुग्णालयावरील हल्ल्यामुळे इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. दोन्हीकडून एकमेकांवर गंभीर आरोप केले जात आहेत. या रुग्णालयातील हल्ल्यात जवळपास 500 लोक मरण पावले आहेत. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो वायडेन यांच्या इस्राइल दौऱ्याच्या काही वेळापूर्वी झालेल्या या स्फोटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर संताप आणि निषेध व्यक्त केला जात आहे.

रुग्णालयावर झालेल्या या भीषण हल्ल्यानंतर इस्त्राइलचे पंतप्रधान बेंजमिन नेतन्याहू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबद्दल भाष्य केलं. ते म्हणाले की, संपूर्ण जगाला माहिती असायला हवं की गाझा येथे क्रूर हल्ला करण्यात आला, तो दहशतवाद्यांनी केला आहे इस्त्राइली सेनेने नाही. ज्या लोकांनी आमच्या मुलांच्या हत्या केल्या ते स्वतःच्या मुलांच्या देखील हत्या करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com