Stranded citizens struggle with 4x flight ticket rates
Esakal
ग्लोबल
युद्धात अडकलेल्यांची विमान कंपन्यांकडून लूट, ३० हजारांच्या तिकिटासाठी मोजावे लागतायत १.२० लाख
Israel-Iran War: इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे आखाती देशात अनेक विद्यार्थी, नोकरदार आणि पर्यटकअडकून पडले आहेत. या सर्वांना विमान तिकिटांच्या दरवाढीचा सामना करावा लागत आहे. तिकिटाचे दर चौपट झाले आहेत.
Flight ticket prices from Dubai to India war crisis पश्चिम आशियात वाढलेल्या संघर्षामुळे तेथील विविध देशांमध्ये अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांसमोर गंभीर आव्हान निर्माण झाले आहे. अनेक विद्यार्थी, नोकरदार आणि पर्यटक या देशांमध्ये अडकून पडले आहेत. या सर्वांना विमान तिकिटांच्या दरवाढीचा सामना करावा लागत आहे. काही हवाई मार्गांवर एकेरी प्रवासाचे तिकीट हे दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

