
इराणने कतारमधील अमेरिकेच्या हवाई तळांवर ६ क्षेपणास्त्रे डागली आहेत. हा हल्ला इराणने अमेरिकेविरुद्ध घेतलेला सूड म्हणून पाहिला जात आहे. इराण आणि अमेरिकेतील तणाव सतत वाढत आहे, इराच्या अणु स्थळांवर अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतर तणाव आणखी वाढला आहे, दरम्यान इराणने हल्ला केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अतिशय कुमकुवत प्रतिसाद असे म्हटले आहे तर आता शांततेची वेळ आली आहे असेही म्हटले आहे.